
आयपीएल 2023 स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. प्रत्येक सामना गुणतालिकेसह प्लेऑफचं चित्र बदलत आहे. त्यामुळे कोण ऐन क्षणी प्लेऑफमध्ये जागा मिळवेल सांगता येत नाही. (Photo : BCCI/IPL)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. 11 पैकी पाच सामन्यात विजय आणि सहा सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. 10 गुण आणि -0.345 च्या धावगतीसह सहाव्या स्थानी आहे. (Photo : BCCI/IPL)

प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी रॉयल चॅलेंजर्सकडे तीन सामने उरले आहेत. त्यापैकी एक 14 मे रोजी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स सोबत होणार आहे. (Photo : BCCI/IPL)

प्लेऑफच्या दृष्टीने दोन्ही संघांना हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. राजस्थानला पराभूत केल्यास आरसीबीचे 12 गुण होतील. तर राजस्थानकडे एकच संधी उरेल. राजस्थानचा शेवटचा सामना पंजाबसोबत आहे. तर बंगळुरुला दोन सामने खेळायचे आहे. (Photo : BCCI/IPL)

आरसीबीने तिन्ही सामने जिंकल्यास चौथ्या स्थानावर पोहोचण्याची संधी आहे. आरसीबीला राजस्थान रॉयल्सनंतर हैदराबाद आणि गुजरातशी सामना करायचा आहे. (Photo : BCCI/IPL)

आरसीबीची प्लेऑफची शक्यता अजूनही कायम आहे. त्यामुळे कधी कोणता उलटफेर होईल सांगता येत नाही. प्रत्येक संघ प्लेऑफच्या दृष्टीने सामना खेळत आहे. (Photo : BCCI/IPL)