IPL 2024 : चेन्नईने आरसीबीच्या नको त्या विक्रमाशी केली बरोबरी, काय ते जाणून घ्या

| Updated on: Apr 24, 2024 | 5:01 PM

आयपीएल स्पर्धेतील 39 सामने पार पडले असून गुणतालिकेत जबरदस्त उलथापालथ होताना दिसत आहे. प्लेऑफसाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. राजस्थान रॉयल्सचा संघ 7 सामने जिंकत अव्वल स्थानी आहे. तर बंगळुरुचा संघ दहाव्या स्थानी आहे. या स्पर्धेत आतापर्यंत अनेक विक्रम रचले आणि मोडले गेलेत. चेन्नई सुपर किंग्सच्या नावावर एक नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.

1 / 6
आयपीएलच्या 39व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ आमनेसामने आले. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. मात्र या पराभवासह चेन्नईचा संघ नको त्या पंगतीत बसला आहे. आरसीबीच्या नकोशा विक्रमाची बरोबरी केली आहे.

2 / 6
आयपीएलमध्ये 200हून अधिक धावा करून सामना गमवण्याचा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या नावावर होता. आरसीबीने पाचवेळा 200हून अधिक धावा करून पराभवाचं तोंड पाहिलं आहे.

3 / 6
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या या विक्रमाशी आता चेन्नई सुपर किंग्सने बरोबरी केली आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 210 धावा केल्या होत्या. पण लखनौने हे आव्हान 19.3 षटकात 6 गडी राखून पूर्ण केलं.

4 / 6
चेन्नई सुपर किंग्सने 200हून अधिक धावा करून पराभव होण्याची ही पाचवी वेळ आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सला नको त्या पंगतीत स्थान मिळालं आहे. आरसीबीच्या विक्रमाशी आता बरोबरी केली आहे.

5 / 6
आयपीएल 2024 स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात दुसरा सामना 18 मे रोजी होणार आहे. बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर हा सामना होताच साखळी फेरीतील सर्व सामने संपतील.

6 / 6
आयपीएलच्या 41व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने येणार आहेत. आरसीबीसाठी हा महत्त्वाचा सामना आहे. कारण या सामन्यात पराभव झाला तर स्पर्धेतील आव्हान खऱ्या अर्थाने संपुष्टात येईल.