
चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने आपल्या नेतृत्वात 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली. आयपीएलच्या 16 मोसमात नेतृत्व केल्यानंतर 17 व्या हंगामाआधी धोनीने ऋतुराज गायकवाड याच्याकडे संघाची धुरा सोपवली. धोनी जवळपास 43 वर्षांचा आहे. त्यामुळे धोनीचा हा अखेरचा हंगाम असू शकतो.

आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसीस याला धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू असलेला फाफ हा 40 वर्षांचा आहे. फाफही या हंगामानंतर निवृत्ती जाहीर करु शकतो.

दिनेश कार्तिक सध्या आरसीबीकडून खेळतोय. त्याआधी कार्तिकने अनेक संघांचं प्रतिनिधित्व कलंय. तसेच कार्तिकने याआधीच हंगामानंतर निवृत्त होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

टीम इंडियाचा वर्ल्ड कप विजेता संघाचा सदस्य पीयूष चावला 35 वर्षांचा आहे. पीयूषचा फिटनेस पाहता तो पुढच्या हंगामाआधीच क्रिकेटला रामराम करु शकतो. पीयूष आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांपैकी एक आहे.

शिखर धवन पंजाब किंग्सचं नेतृत्व करतोय. धवन गेल्या काही काळापासून टीम इंडियातही नाही. तसेच गब्बरला त्याच्या लौकीकाला साजेशी खेळीही करता आली नाहीये. त्यामुळे शिखर या हंगामानंतर कीरकीर्दीबाबत निर्णय घेऊ शकतो.