IPL 2024 : ग्लेन मॅक्सवेलमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची चिंता वाढली, वाचा आतापर्यंत काय झालं ते

| Updated on: Apr 08, 2024 | 6:36 PM

आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची निराशाजनक कामगिरी सुरु आहे. आतापर्यंत आरसीबीने पाच सामने खेळले असून चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. तर सहाव्या सामन्यात बंगळुरुला मुंबई इंडियन्सचा सामना करायचा आहे. पण या सामन्यापूर्वी आरसीबीची चिंता वाढली आहे.

1 / 6
आयपीएल 2024 स्पर्धेत आरसीबीची हाराकिरी सुरुच आहे. पाच पैकी फक्त एका सामन्यात विजय मिळाला आहे. तर चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. गुणतालिकेतही आरसीबीचा संघ नवव्या स्थानावर आहे. त्यामुळे प्लेऑफचा मार्ग कठीण होत चालला आहे.

2 / 6
आरसीबीच्या पराभवाची अनेक कारणं समोर आली आहे. त्यापैकी स्टार खेळाडू फॉर्मात नसल्याने फटका बसला आहे. ग्लेन मॅक्सवेलकडून संघाला बऱ्याच अपेक्षा आहेत. मात्र पाच सामन्यात त्याची निराशाजनक कामगिरी राहिली आहे.

3 / 6
ग्लेन मॅक्सवेलने पाच सामन्यात फक्त 32 धावा केल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात तर खातंही खोलता आलं नाही. तर पंजाब विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आणि फाफने चांगली सुरुवात करून दिली असताना मॅक्सवेल काही करू शकला नाही. फक्त 3 धावा करून तंबूत परतला.

4 / 6
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात 28 धावा केल्या होत्या. तर लखनौ जायंट्सविरुद्ध शून्यावर तंबूत परतला. तर राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात फक्त एक धाव केली.

5 / 6
पाच सामन्यात मॅक्सवेल दोन शून्यावर, दोनदा सिंगल डिजिट करून बाद झाला. पाच सामन्यात त्याने 6.40 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. ग्लेन मॅक्सवेलच्या खराब कामगिरीचा फटका संघाला बसत आहे. संघात असून नसल्यासारखा आहे.

6 / 6
ग्लेन मॅक्सवेलने मागच्या पर्वातील 14 सामन्यात 400 धावा केल्या होत्या. तसेच पाच अर्धशतकं झळकावली होती. मात्र आता पाच सामन्यात मिळून 50 धावाही झालेल्या नाहीत.