
सुनील नरीनने राजस्थान विरुद्ध आक्रमक फलंदाजीचं दर्शन घडवलं आहे. 49 चेंडूत 11 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने शतकी खेळी केली. 204.08च्या स्ट्राईक रेटने शतक ठोकलं.

सुनील नरीनने शतकी खेळीनंतर आपला आक्रमक अंदाज कायम ठेवला. त्यात आणखी 9 धावांची भर पडली. मात्र ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने 56 चेंडूत 109 धावा केल्या. यात 13 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.

सुनील नरीनने आर अश्विनला 17 चेंडूत 34, युझवेंद्र चहलला 11 चेंडूत 33, कुलदीप सेनला 9 चेंडूत 21, आवेश खानला 12 चेंडूत 15 आणि ट्रेंट बोल्टला 7 चेंडूत 6 धावा केल्या.

सुनील नरीनने या खेळीसह ऑरेंज कॅपच्या शर्यातील उडी मारली आहे. थेट तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. सुनील नरीनने एक अर्धशतक आणि शतकाच्या जोरावर धावा केल्या आहेत

सुनील नरीनने यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 39 चेंडूत 85 धावा केल्या होत्या. यावेळी त्याचं शतक अवघ्या 15 धावांनी हुकलं होतं. (सर्व फोटो- KKR Twitter)