
आयपीएलच्या 17 व्या पर्वात आरसीबीच्या सर्वात खराब कामगिरीचं दर्शन घडलं आहे. आतापर्यंत 7 सामन्यापैकी 6 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे फक्त दोन गुण खात्यात असून गुणतालिकेत सर्वात तळाशी आहे.

आरसीबीचं प्लेऑफचं गणित आता फक्त दोन सामन्यावर अवलंबून आहे. त्यात पराभव झाला की थेट प्लेऑफचा पत्ता कट. असं असताना आरसीबीने एक महत्वाची घोषणा केली असून नव्या जर्सीसह मैदानात उतरणार आहे. आरसीबी ग्रीन जर्सीसह मैदानात उतरणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात 21 एप्रिलला सामना होणार आहे. हा सामना रविवारी ईडन गार्डनवर होणार आहे. या सामन्यात आरसीबीचा संघ हिरव्या जर्सीसह उतरेल. फ्रेंचायसीने याबाबतची माहिती एक्स सोशल अकाउंटवरून दिली आहे.

आयपीएल 2011 स्पर्धेपासून आरसीबी प्रत्येक पर्वात हिरव्या रंगाची जर्सी एका सामन्यात परिधान करते. या माध्यमातून स्वच्छ आणि हरित पर्यावरणाविषयीचा संदेश दिला जातो.

आरसीबी संघ कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात हिरव्या जर्सीत खेळणार आहे. संघाची नवीन जर्सी खूपच आकर्षक आहे. या जर्सीच्या टीशर्टमध्ये हिरवा आणि निळा रंग वापरण्यात आला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ: विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अल्झारी जोसेफ, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, रीस टोपले, टॉम कुरन , स्वप्नील सिंग, विजयकुमार विशक, लॉकी फर्ग्युसन, मयंक डागर, विल जॅक्स, सुयश प्रभुदेसाई, अनुज रावत, मनोज भंडागे, यश दयाल, सौरव चौहान, राजन कुमार, हिमांशू शर्मा