
आयपीएल 2024 स्पर्धेतील आतापर्यंत झालेल्या 32 सामन्यात 500 हून अधिक षटकार मारले गेले आहेत. त्यामुळे स्पर्धेच्या शेवटी 1000 हून अधिक षटकार झाले तर आश्चर्य वाटायला नको. हेन्रिक क्लासेनने 24, सुनील नरीन आणि रियान परागने 20, निकोलस पूरनने 19 आणि दिनेश कार्तिकने 18 षटकार ठोकले आहेत.

सनरायझर्स हैदराबादचा मधल्या फळीतील फलंदाज हेन्रिक क्लासेन षटकारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. क्लासेनने 6 सामन्यात एकूण 24 षटकार मारले आहेत. त्यामुळे ख्रिस गेलच्या नावावर गेल्या काही वर्षांपासून अबाधित असलेला विक्रम मोडण्याची शक्यता आहे.

आयपीएलच्या एका पर्वात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने 2012 च्या पर्वात 59 षटकार मारले होते. त्यानंतर हा विक्रम अद्याप कायम आहे.

हेन्रिक क्लासेनने अवघ्या 6 सामन्यात 24 षटकार मारले आहेत. साखळी फेरीचे सामने अजून बाकी आहेत. त्यामुळे उर्वरित 8 सामन्यात षटकारांची संख्या वाढू शकते. तसेच ख्रिस गेलचा विक्रम मोडीत निघू शकतो.

सनरायझर्स हैदराबादने प्लेऑफमध्ये प्रवेश केला तर आणखी एखाद दुसरा सामना वाटेला येईल. त्यामुळे ख्रिस गेलचा विक्रम यंदाच्या पर्वात मोडला गेला तर आश्चर्य वाटणार नाही.