मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, मोडला 16 वर्ष जुना विक्रम

आयपीएल 2025 स्पर्धेच्या 16व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात लखनौने 20 षटकात 8 गडी गमवून 203 धावा केल्या आणि विजयासाठी 204 धावा दिल्या. हार्दिक पांड्याने या सामन्यात पाच विकेट घेतल्या.

| Updated on: Apr 04, 2025 | 10:20 PM
1 / 5
आयपीएल 2025 च्या 16व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध 5 विकेट घेतल्या. यासह मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने आयपीएल स्पर्धेत इतिहास रचला आहे.

2 / 5
 हार्दिकने या सामन्यात आपल्या संघासाठी उत्कृष्ट गोलंदाजी केली. तसेच लखनौ सुपर जायंट्सच्या 5 फलंदाजांना बाद करण्यात यशस्वी झाला. या सामन्यात त्याने 4 षटकांत 36 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.

3 / 5
लखनौविरुद्ध 5 विकेट्स घेत मुंबईचा कर्णधार हार्दिकने कुंबळेचा 16 वर्षांचा जुना विक्रम मोडला. कर्णधार म्हणून आयपीएल सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे.

4 / 5
2009 च्या आयपीएलमध्ये अनिल कुंबळेने 16 धावांत 4 बळी घेतले होते. पण आता हार्दिकने 36 धावांत 5 बळी घेत त्याला मागे टाकले आहे.

5 / 5
पांड्याने आतापर्यंत कर्णधार म्हणून या लीगमध्ये 36 डावांमध्ये 30 विकेट्स घेतल्या आहेत, तर कुंबळेने कर्णधार म्हणून 26 डावांमध्ये 30 विकेट्स घेतल्या आहेत. तर अश्विनने 28 डावांमध्ये 25 विकेट्स घेतल्या होत्या. (Photo- Mumbai Indians)