
आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादला पराभूत करून पाचवा विजय मिळवला आहे. सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 144 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान मुंबई इंडियन्सने 15.4 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह मुंबईला दोन गुण मिळाले आणि नेट रनरेटमध्ये फायदा झाला आहे.

विजयासह मुंबई इंडियन्सने सहाव्या स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. मुंबई इंडियन्स या स्पर्धेत पाचवा विजय मिळवला आणि 10 गुण आणि +0.673 नेट रनरेट आहे. यामुळे दोन तीन वर्षानंतर टॉप 4 मध्ये धडक मारली आहे. आता प्लेऑफचं गणित सोपं होताना दिसत आहे.

मुंबई इंडियन्स आतापर्यंत या स्पर्धेत एकूण 9 सामने खेळला आहे. अजून या स्पर्धेत 5 सामने खेळायचं बाकी आहे. या पाच सामन्यांवर मुंबई इंडियन्सचं गणित अवलंबून आहे. मुंबई इंडियन्सला पाच पैकी ती सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. तीन सामन्यात विजय मिळवताच प्लेऑफमध्ये स्थान पक्कं होणार आहे.

मुंबई इंडियन्सचे 10 गुण आहेत. तर आणखी तीन विजय मिळवले तर 16 गुण होतील. आयपीएल स्पर्धेत 16 गुण मिळाले तर प्लेऑफमधील स्थान पक्कं होतं. त्यामुळे मुंबई इंडियन्सला तीन विजयाची गरज आहे. आता उर्वरित पाच सामन्यात मुंबई कशी कामगिरी करते याकडे लक्ष लागून आहे.

मुंबई इंडियन्सचा पुढील पाच सामने हे लखनौ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स, गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्याशी होणार आहे. राजस्थान रॉयल्स वगळता इतर संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या शर्यतीत आहेत. (सर्व फोटो- मुंबई इंडियन्स ट्वीटर)