
आयपीएल 2025 स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने अंतिम टप्प्यात आले आहेत. रविवारी पार पडलेल्या डबल हेडर सामन्यानंतर तीन संघांची प्लेऑफमध्ये वर्णी लागली आहे. गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स हे संघ प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. आता एका जागेसाठी तीन संघांमध्ये चुरस आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स या जागेसाठी दावेदाऱ आहेत. चला जाणून घेऊयात समीकरण

गुणतालिकेत मुंबई इंडियन्स 14 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. अजूनही दोन सामने खेळायचे आहेत. मुंबई इंडियन्सने दोन्ही सामने जिंकले तर प्लेऑफमधील स्थान पक्कं होणार आहे. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजय मिळवला आणि पंजाब किंग्सविरुद्ध पराभव पत्करला तरीही प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतात. कारण लखनौ सुपरजायंट्स मुंबई इंडियन्सला फक्त तेव्हाच मागे टाकू शकते जेव्हा त्यांनी पुढील तीन सामने जिंकेल आणि त्यांचा नेट रन रेट चांगला असेल. त्यामुळे मुंबईने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजय मिळवला तर ते प्लेऑफसाठी जवळजवळ निश्चितच पात्र ठरतील. (PHOTO_ IPL/BCCI)

गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्स पाचव्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्सला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी त्यांचे दोन्ही सामने जिंकावे लागतील. तसेच लखनौ सुपरजायंट्सना त्यांच्या पुढील तीन सामन्यांपैकी एक सामना गमावला तर हे गणित सुटेल. यासह दिल्ली कॅपिटल्स एकूण 17 गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरू शकते. (PHOTO_ IPL/BCCI)

लखनौ सुपर जायंट्स गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. लखनौ सुपरजायंट्सना अजूनही तीन सामने खेळायचे आहेत. फक्त हे तीन सामने जिंकणे पुरेसे नाही. तर मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध हरेल अशी अपेक्षा करावी लागेल. तसेच पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध जिंकणं आवश्यक आहे. तरच लखनौ सुपरजायंट्स नेट रन रेटच्या आधारे पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचू शकेल. (PHOTO_ IPL/BCCI)

मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स पैकी एका संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे चार संघ प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडले आहेत.