MI vs RCB : इलाका तुम्हारा धमाका हमारा, विराटची ऐतिहासिक कामगिरी, मुंबई विरुद्ध महारेकॉर्ड

Virat Kohli Most Runs Against Mumbai Indians : विराट कोहली याने वानखेडे स्टेडियममध्ये 38 बॉलमध्ये 5 फोर आणि 1 सिक्ससह 50 रन्स केल्या. विराटने यासह मुंबई विरुद्ध धावांबाबत सर्वात मोठा विक्रम मोडीत काढला.

| Updated on: Apr 12, 2026 | 9:40 PM
1 / 5
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने मुंबई इंडियन्स विरूद्धच्या सामन्यात ऐतिहासिक कामिगिरी केली आहे. विराटने वानखेडेत फिल सॉल्ट याच्यासह झंझावाती सुरुवात करत मोठा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. (Photo Credit : BCCI/IPL)

2 / 5
मुंबईने टॉस जिंकल्यानंतर आरसीबीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. विराट आणि फिलिप सॉल्ट या सलामी जोडीने शतकी भागीदारी केली. या दरम्यान विराट आणि फिल सॉल्ट या दोघांनी चौफेर फटकेबाजी करुन मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली.  (Photo Credit : BCCI/IPL)

3 / 5
विराटने मुंबई विरुद्ध 38 चेंडूत 50 धावांची खेळी केली. विराटने या दरम्यान 20 धावा पूर्ण करताच ऐतिहासिक कामगिरी केली.  विराटने 20 वी धाव घेताच महारेकॉर्ड ब्रेक केला. विराट मुंबई इंडियन्स विरुद्ध सर्वाधिक आणि वेगवान 1 हजार धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला. विराटने यासह केएल राहुल याचा रेकॉर्ड ब्रेक केला. (Photo Credit : BCCI/IPL)

4 / 5
विराट कोहली याच्याआधी मुंबई इंडियन्स विरुद्ध सर्वाधिक धावांचा विक्रम हा केएल राहुल याच्या नावावर होता. केएल राहुल याने मुंबई विरुद्ध 2014 ते 2026 दरम्यान 21 सामन्यांत 977 धावा केल्या आहेत. (Photo Credit : BCCI/IPL)

5 / 5
दरम्यान विराट कोहली आणि फिलिप सॉल्ट या सलामी जोडीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अप्रतिम सुरुवात मिळवून दिली. विराट आणि फिल या दोघांनी आरसीबीसाठी 10.5 ओव्हरमध्ये 120 रन्सची पार्टनरशीप केली. (Photo Credit : BCCI/IPL)

Follow Us