IPL 2026: कशी नशिबाने थट्टा मांडली, बुमराहसह 6 गोलंदाजांवर ओढावली अशी वेळ, नक्की काय झालं?

IPL 2026 : आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात तिसऱ्या फेरीचा थरार सुरु आहे. काही संघ अजिंक्य आहेत. तर काही संघांची विजयाची प्रतिक्षा कायम आहे. या मोसमात आतापर्यंत 6 गोलंदाजांना विकेट मिळवता आली नाहीय. यामध्ये जसप्रीत बुमराहसारख्या गोलंदाजांचा समावेश आहे. जाणून घ्या.

Sanjay patil | Updated on: Apr 08, 2026 | 4:52 PM
1 / 5
मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमराह त्याच्या आयपीएल पदार्पणापासून मुंबई इंडियन्ससाठी खेळतोय. बुमराह आयपीएलमधील यशस्वी गोलंजदाजांपैकी एक आहे. मात्र बुमराह 19 व्या मोसमात अपयशी ठरला आह. बुमराहला एकही विकेट मिळवता आलेली नाही. विशेष म्हणजे बुमराहसह एकूण 6 गोलंदाज 19 व्या मोसमात विकेट्स घेण्यात अपयशी ठरले आहेत. (Photo Credit: PTI)

2 / 5

बुमराह व्यतिरिक्त चेन्नई सुपर किंग्सचे 2 गोलंदाजही विकेट्सचं खातं उघडण्यात अपयशी ठरले आहेत. फिरकीपटू नूर अहमद आणि वेगवान गोलंदाज खलील अहमद या दोघांना विकेट मिळवता आली नाहीय. सीएसकेने 19 व्या मोसमात तिन्ही सामने गमावले आहेत. (Photo Credit: PTI)

3 / 5

मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट हा देखील विकेट घेण्यात अपयशी ठरला आहे. बोल्टने 2 सामन्यांत एकूण 5 ओव्हर बॉलिंग केली. मात्र बोल्टला विकेट मिळाली नाही. (Photo Credit: PTI)

4 / 5

हर्षल पटेल आयपीएल स्पर्धेत पर्पल कॅप विजेता गोलंदाज राहिला आहे. मात्र 19 व्या मोसमात सनरायजर्स हैदराबादसाठी खेळणाऱ्या हर्षलला विकेट्ससाठी संघर्ष करावा लागत आहे. हर्षलने 2 सामन्यांमध्ये एकूण 5.4 ओव्हर बॉलिंग केलीय. (Photo Credit: PTI)

5 / 5

अर्शदीप सिंह पंजाब किंग्सचं तर मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती केकेआरचं प्रतिनिधित्व करतोय. दोघेही भारतीय संघाचे स्टार गोलंदाज आहेत. मात्र या दोघांना आयपीएलच्या 19 व्या मोसमात एकही विकेट मिळवता आली नाहीय. (Photo Credit: PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us