IPL 2026: विराटचा घरच्या मैदानात कारनामा, रोहित शर्माचा मोठा रेकॉर्ड ब्रेक

Virat Kohli IPL 2026 : विराट आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून आरसीबीसाठी खेळतोय. विराट या स्पर्धेतील सर्वात यशस्वी फलंदाज आहे. विराटने आता 19 व्या मोसमातील आपल्या दुसऱ्या सामन्यात 28 धावा करुन रोहित शर्माचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

Sanjay patil | Updated on: Apr 05, 2026 | 9:29 PM
1 / 5
आरसीबीचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याने आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. विराटने रविवारी 5 एप्रिलला सनराजयर्स हैदराबाद विरुद्ध आणखी एक विक्रम केला आहे.  (Photo Credit: PTI)

आरसीबीचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याने आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. विराटने रविवारी 5 एप्रिलला सनराजयर्स हैदराबाद विरुद्ध आणखी एक विक्रम केला आहे. (Photo Credit: PTI)

2 / 5

विराटने राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये 18 बॉलमध्ये 28 रन्स केल्या. विराटने या खेळीत 2 चौकार आणि 1 षटकार लगावला. अंशुल कंबोज याने विराटच्या या खेळीला ब्रेक लावला. (Photo Credit: PTI)

3 / 5

विराटने 28 धावांच्या खेळीसह मोठा विक्रम आपल्या नावावर केला. विराट आयपीएल स्पर्धेत एका टीम विरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. विराटने याबाबत मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याचा रेकॉर्ड ब्रेक केला. (Photo Credit: PTI)

4 / 5

विराटने चेन्ई विरुद्ध आतापर्यंत एकूण 36 सामन्यांमध्ये 10 अर्धशतकांसह एकूण 1 हजार 174 धावा केल्या आहेत. विराट यासह एका टीम विरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. (Photo Credit: PTI)

5 / 5

तसेच विराटआधी रोहितने केकेआर विरुद्ध आयपीएल स्पर्धेत एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा कारनामा केला होता. रोहितने केकेआर विरुद्ध 36 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 7 अर्धशतकांसह 1 हजार 161 रन्स केल्या होत्या. (Photo Credit: PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us