IPL 2026, RCB vs GT Qualifier 1: कागिसो रबाडाने 25वी विकेट घेत रचला इतिहास, असं पहिल्यांदाच घडलं

आयपीएल 2026 क्वॉलिफायर 1 सामन्यात गुजरात टायटन्सच्या कागिसो रबाडाने ऐतिहासिक कामगिरी केली. वेंकटेश अय्यरची विकेट घेतली आणि आयपीएलमधील मोठा विक्रम नावावर केला. आयपीएलच्या तीन पर्वात त्याने विक्रम नोंदवला आहे.

| Updated on: May 26, 2026 | 8:50 PM
1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून गुजरातने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. या सामन्यातील दुसऱ्या षटकात कागिसो रबाडाने विक्रमाची नोंद केली.  (Photo: IPL/BCCI)

2 / 5
कागिसो रबाडा वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी आला. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने वेंकटेश अय्यरची विकेट काढली. या विकेटसह कागिसो रबाडाने विक्रम नोंदवला. आयपीएल स्पर्धेच्या तीन पर्वात  25हून अधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. (Photo: IPL/BCCI)

3 / 5
कागिसो रबाडाने 2019 मध्ये 25 विकेट घेतल्या होत्या. त त्यानंतर 2020-21 च्या आयपीएल हंगामात 30 बळी घेतले होते. आता या पर्वात 25 विकेटची नोंद केली आहे. रबाडाच्या आधी हा विक्रम ड्वेन ब्राव्होच्या नावावर होता, त्याने ही कामगिरी दोनदा केली होती. (Photo: IPL/BCCI)

4 / 5
कागिसो रबाडाने एकाच आयपीएल हंगामात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा पराक्रमही केला आहे. या हंगामात रबाडाने पॉवरप्लेमध्ये 18 बळी घेत एक विक्रम प्रस्थापित केला आहे. यापूर्वी 2023 मध्ये मोहम्मद शमीने पॉवरप्लेमध्ये 17 बळी घेतले होते. तर 2013 मध्ये मिचेल जॉन्सनने 16 बळी घेतले होते. (Photo: IPL/BCCI)

5 / 5
आयपीएल 2026 च्या पर्पल कॅपच्या शर्यतीत कागिसो रबाडा सध्या अव्वल स्थानी आहे. त्याने 25 बळी घेतले आहेत, मात्र 24 बळी घेणारा आरसीबीचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार त्याच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे आता या शर्यतीत पुढे कोण जाणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. (Photo: IPL/BCCI)

Follow Us