CSK : सीएसकेची सलामी जोडी फुस्स, कॅप्टन ऋतुराजची सर्वात वाईट स्थिती, पाहा आकडे
IPL 2026 : आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात चेन्नईसाठी नवी जोडी सलामीला आली. ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन या ओपनिंग जोडीला काही खास करता आलं नाही.

चेन्नई सुपर किंग्स टीमने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एकूण 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. मात्र हीच चेन्नई 19 व्या मोसमात संघर्ष करताना दिसतेय. चेन्नईने निर्णायक क्षणी कमबॅक करुन आपलं प्लेऑफच्या शर्यतीतील आव्हान कायम ठेवलंय. मात्र चेन्नईला एका बाबतीत अद्याप झगडावं लागतंय. चेन्नईचा हा संघर्ष नक्की कशाबाबत आहे हे जाणून घेऊयात. (Photo Credit: PTI)

कॅप्टन ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन हे दोघे चेन्नईसाठी ओपनिंग करतात. मात्र दोघांना इतर संघांच्या तुलनेत विस्फोटक सुरुवात करता आलेली नाही. सीएसकेची या मोसमातील आतापर्यंतची सर्वात संथ सलामी जोडी ठरली आहे. (Photo Credit: PTI)

उपलब्ध आकड्यांनुसार, चेन्नईच्या सलामी जोडीने 8.48 च्या रनरेटने धावा केल्या आहेत. हा स्पर्धेतील सर्वात कमी रनरेट आहे. तसेच सरासरी ही 22.9 इतकी आहे. तर केकेआरची सरासरी ही 21.77 इतकी आहे. (Photo Credit: PTI)

चेन्नईचा कर्णधार आणि ओपनर ऋतुराज या दोघांनाही संघाला झंझावाती सुरुवात करुन देता आलेली नाही. संजूने काही डावात वेगात धावा केल्या आहेत. मात्र ऋतुराजला 2 अर्धशतकांचा अपवाद वगळता काही खास करता आलं नाही. (Photo Credit: PTI)

दरम्यान 19 व्या मोसमात एकूण 20 सलामीवीर फलंदाज असे आहेत ज्यांनी किमान 5 डावात बॅटिंग केली आहे. या 20 पैकी ऋतुराज एकमेव असा ओपनर आहे ज्याच्या पहिल्या 15 बॉलमधील स्ट्राईक रेट हा 130 पेक्षा कमी आहे. ऋतुराजचा स्ट्राईक रेट हा 116 इतका आहे. (Photo Credit: PTI)