
टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील विजेता संघ टीम इंडिया विरुद्ध अंतिम फेरीत भिडेल.

या 13 व्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत क्रिकेट विश्वाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. या खेळाडूंची आयपीएल ऑक्शनमध्ये चांदी होऊ शकते. ते खेळाडू कोण आहेत जाणून घेऊयात.

भारतीय वंशाचा आणि न्यूझीलंडचा युवा फलंदाज रचिन रवींद्र याने पहिल्याच वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार कामगिरी केली. रचिनने 10 सामन्यात 578 धावा केल्या.

न्यूझीलंडच्या डॅरेल मिचेल याने तडाखेदार बॅटिंग केली. डॅरेलने 2 शतकांसह या वर्ल्ड कपमध्ये 552 धावा केल्या.

अफगाणिस्तानचा ऑलराउंडर अजमतुल्लाह ओमरझई याने बॅटिंग आणि बॉलिंगने धमाका केला. ओमरझई याने स्पर्धेत 353 धावा केल्या. तसेच 7 विकेट्स घेतल्या. त्यामुळे या 3 खेळाडूंना आपल्या गोटात घेण्यासाठी फ्रँचायझीमध्ये चुरस पाहायला मिळणार इतकं निश्चित.