
मुंबई इंडियन्स आयपीएलच्या 17 व्या मोसमातील आपला एकूण पाचवा आणि वानखेडे स्टेडियममधील दुसरा सामना हा 11 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध खेळणार आहे.

मुंबई इंडियन्सने या हंगामात आतापर्यंत हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात 4 सामने खेळले आहेत. मुंबईने सलग 3 सामने गमावले. त्यानंतर चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध विजयाचं खातं उघडलं.

तर फाफ डु प्लेसीस याच्या नेतृत्वात आरसीबीने 5 सामने खेळलेत. आरसीबीने या 5 पैकी 4 सामने गमावलेत तर एकमेव सामना जिंकला आहे.

मुंबई आणि आरसीबी यांच्यात आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात एकूण 32 वेळा आमनासामना झाला आहे. या दोघांपैकी कोणता संघ वरचढ राहिला आहे? हे जाणून घेऊयात.

मुंबई आरसीबीवर वरचढ राहिली आहे. मुंबईने आरसीबीचा 32 पैकी 18 सामन्यात धुव्वा उडवला आहे. तर आरसीबीने 14 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांची या 17 व्य मोसमात निराशाजनक कामगिरी राहिली आहे. त्यामुळे आता 11 एप्रिलचा सामना दोघांसाठी महत्त्वाचा असा आहे.

मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.

आरसीबी टीम : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), यश दयाल, विजयकुमार वैशाख, विराट कोहली, दिनेश कार्तिक, रीस टोपले, स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, हिमांशू शर्मा, राजन कुमार, मोहम्मद सिराज, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मयंक डागर, सुयश प्रभुदेसाई, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, विल जॅक्स, कॅमरुन ग्रीन, मोहम्मद सिराज, मनोज भंडागे, आकाश दीप, रजत पाटीदार, सौरव चौहान आणि अनुज रावत.