
आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु एक तगडा संघ आहे. आयपीएलने 16 सिझन खेळले आहेत. या संघाला अद्याप एकही जेतेपद जिंकता आलेलं नाही.

आरसीबीसाठी आठ वर्षे खेळणाऱ्या युजवेंद्र चहल याने यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला. द रणवीर शोमध्ये त्याने याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने त्यावर उत्तर देत म्हणाला की..

"मी आठ वर्षांपासून याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहे. 2016 साली एक संधी होती. कारण आमच्याकडे ख्रिस गेल आणि केएल राहुल होता. पण आम्ही अंतिम सामना हरलो."

"अंतिम सामना चिन्नास्वामी मैदानात खेळला गेला आणि 8 ते 10 धावांनी सामना हरलो. हे खूपच दुखद होतं."

"2014 पासून मी आरसीबी सोबत खेळत होतो. विराट कोहलीने माझ्यावर विश्वास दाखवला. पण मला फ्रेंचाईसीने आठ वर्षे खेळल्यानंतर बाहेरचा रस्ता दाखवला म्हणून वाईट वाटलं."

पुन्हा लिलावात खरेदी करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. आयपीएल 2022 च्या लिलावात आरसीबीने मला विकत घेतले नाही.