Ranji Trophy स्पर्धेत 10 हजार धावा करत फलंदाजाने रचला इतिहास, 91 वर्षात दुसऱ्यांदा असं घडलं

रणजी ट्रॉफीच्या इतिहासात जम्मू काश्मीरचा संघ पहिल्यांदाच उपांत्य फेरीत खेळत आहे. या सामन्यात बंगालने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना जम्मू काश्मीरची सुरुवात काही चांगली झाली नाही. तीन विकेट झटपट गमावल्या. त्यानंतर कर्णधार पारस डोगराने डाव सांभळला आणि इतिहास रचला.

| Updated on: Feb 16, 2026 | 8:23 PM
1 / 5
देशांतर्गत क्रिकेटमधील रणजी ट्रॉफी ही सर्वात जुनी आणि मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळतं. या स्पर्धेत एका खेळाडूने 10 हजार धावांचा पल्ला गाठला आहे. जम्मू काश्मीरचा कर्णधार पारस डोगराने ही कामगिरी केली आहे. (Photo: PTI)

देशांतर्गत क्रिकेटमधील रणजी ट्रॉफी ही सर्वात जुनी आणि मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळतं. या स्पर्धेत एका खेळाडूने 10 हजार धावांचा पल्ला गाठला आहे. जम्मू काश्मीरचा कर्णधार पारस डोगराने ही कामगिरी केली आहे. (Photo: PTI)

2 / 5

रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेच्या दुसर्‍या उपांत्य फेरीत पारस डोगराने बंगालविरुद्ध ही कामगिरी केली. त्याने या सामन्यातील पहिल्या डावात 58 धावा केल्या आणि मैलाचा दगड गाठला. त्याच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. (Photo: PTI)

3 / 5

देशांतर्गत क्रिकेटमधील अनुभवी फलंदाज म्हणून पारसकडे पाहिलं जातं. त्याने 146व्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत 10 हजार धावांचा पल्ला गाठला. यात त्याने 33 शतकं ठोकली आहे. अशी कामगिरी करणारा वसिम जाफरनंतर दुसरा फलंदाज आहे. (Photo: PTI)

4 / 5

पारस डोगराने ही कामगिरी वयाच्या 41व्या वर्षी केली. इतकंच काय तर जम्मू काश्मीरचं कर्णधारपदही भूषवत आहे. जम्मू काश्मीरने रणजी ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठली आहे. (Photo: PTI)

5 / 5

जम्मू काश्मीरने बंगालने पहिल्या डावात केलेल्या 328 धावांचा पाठलाग करताना अवघ्या 13 धावांवर 3 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर पारसने अब्दुल समदसोबत 143 धावांची भागीदारी केली. पारस 112 चेंडूत 58 धावा करून बाद झाला. मुकेश कुमारने त्याची विकेट काढली. (Photo: PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us