जसप्रीत बुमराहच्या शिरपेचात मानाचा तुरा, अशी कामगिरी करणारा दुसरा वेगवान गोलंदाज

आयपीएल स्पर्धेतील सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने एका विक्रमाची नोंद केली आहे. त्याने आपल्या टी20 क्रिकेट कारकिर्दित त्रिशतक ठोकलं आहे. जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Apr 23, 2025 | 10:14 PM
1 / 5
आयपीएल 2025 स्पर्धेतील 41वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादला 20 षटकात 143 धावांवर रोखलं. या सामन्यात ट्रेंट बोल्टने 4 विकेट घेऊन कमाल केली. तर जसप्रीत बुमराहने एक विकेट घेऊन विक्रमाची नोंद केली आहे.

2 / 5
जसप्रीत बुमराहने 4 षटकं टाकून 1 विकेट घेत 39 धावा दिल्या. जसप्रीत बुमराहने हेनरिक क्लासेनची विकेट काढली. खरं तर ही खूपच महत्त्वाची विकेट होती. त्याने 44 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकार मारत 71 धावा केल्या होत्या. पण त्याला बुमराहने तंबूचा रस्ता दाखवला.

3 / 5
जसप्रीत बुमराहने त्याच्या 238 व्या टी20 सामन्यात 300 विकेट्स पूर्ण केल्या. बुमराहाने भारतासाठी 70 टी20 सामने खेळले असून त्यात 89 बळी घेतले आहेत.त्याचा इकॉनॉमी रेट 6.27 आहे.

4 / 5
जसप्रीत बुमराह हा टी20 क्रिकेटमध्ये 300 बळींचा टप्पा गाठणारा दुसरा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. या यादीत भुवनेश्वर कुमार आघाडीवर आहे. त्याने 318 बळी घेतले आहेत. युजवेंद्र चहल , पियुष चावला आणि भुवनेश्वर यांच्यानंतर बुमराह 300 टी20 विकेट घेणारा चौथा भारतीय गोलंदाज आहे.

5 / 5
जसप्रीत बुमराह 2013 पासून मुंबई इंडियन्ससोबत आहे. 138  सामन्यांमध्ये 165 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. मुंबई इंडियन्सच्या पाचही आयपीएल विजेत्या संघात होता. बुमराह आयपीएल 2023 मध्ये पाठीच्या दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. (सर्व फोटो- बीसीसीआय/आयपीएल)