
भारताने वेस्ट इंडिज विरुद्धची मालिका 2-1 ने जिंकली. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर 200 धावांनी विजय मिळवला.

टीम इंडियाने वनडे वर्ल्डकप डोळ्यासमोर ठेवून काही बदल केले होते. वरिष्ठ खेळाडूंना आराम दिला होता. तर काही खेळाडूंना संधी दिली होती. वेगवान उमरान मलिक याच्या जागेवर जयदेव उनाडकटला संधी देण्यात आली. हा सामना खेळताच त्यांने 27 वर्ष जुना विक्रम मोडला.

जयदेव उनाडकट याला 2013 नंतर वनडे संघात पुन्हा एकदा स्थान स्थान मिळालं आहे. 2013 नंतर आतापर्यंत बराच कालावधी या दरम्यान गेला. इतक्या कालावधीनंतर खेळणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

जयदेव उनाडकट याच्या आधी हा विक्रम रॉबिन सिंग याच्या नावावर होता. त्याने सात वर्षे आणि 230 दिवसानंतर संघात पुनरागमन केलं होतं. त्यानंतर जयदेवने 9 वर्षे आणि 210 दिवसांनी एकदिवसीय संघात स्थान मिळवलं आहे.

माजी लेग-स्पिनर अमित मिश्रा या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये 6 वर्षे, 160 दिवसांचे अंतर आहे. एप्रिल 2003 मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळलेल्या अमितला सप्टेंबर 2009 मध्ये वनडे संघात स्थान मिळालं होतं.

या यादीत चौथ्या क्रमांकावर यष्टीरक्षक पार्थिव पटेल याचं नाव येतं. त्याने सहा वर्षे आणि 133 दिवसांनंतर वनडे संघात स्थान मिळवलं होतं.

रॉबिन उथप्पा याचा पाच वर्षे 344 दिवसांच्या मोठ्या अंतरानंतर एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला होता. या यादीत तो पाचव्या स्थानावर आहे.

जयदेव उनाडकट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक अंतर असलेल्या खेळाडूंच्या यादीत आठव्या स्थानावर आहे. न्यूझीलंडच्या जेफ विल्सन याने 11 वर्षे आणि 331 दिवसांनी एकदिवसीय संघात पुनरागमन केलं होतं.