जो रूटच्या खांद्यावर पुन्हा दिली जाणार कर्णधारपदाची धुरा! ईसीबीच्या निर्णयाने आश्चर्याचा धक्का
बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर इंग्लंड संघासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. असं असताना इंग्लंड कसोटी संघाची धुरा पुन्हा एकदा जो रूटच्या खांद्यावर देण्याची तयारी सुरू झाली आहे.

इंग्लंडच्या कसोटी कर्णधारपदी पुन्हा एकदा जो रूटची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. यापूर्वी हॅरी ब्रूकचं नाव चर्चेत होतं. पण आता जो रूटचं नाव पुढे आलं आहे. ब्रूक वनडे आणि टी20 संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्ड त्याच्याकडे तिसऱ्या फॉर्मेटची जबाबदारी देऊ इच्छित नाही. (फोटो-GETTY IMAGES)

हॅरी ब्रूकने नुकतंच कसोटी कर्णधारपदाबाबत एक विधान केलं होतं. संधी मिळाली तर नक्कीच जबाबदारी पार पाडेन असं सांगितलं होतं. पण निवडकर्त्यांच्या मनात जो रूट कर्णधार म्हणून उमेदवार आहे. (फोटो-GETTY IMAGES)

जो रूट 2017 मध्ये इंग्लंड संघाचा कर्णधार होता. त्याने एलिस्ट कुकची जागा घेतली होती. इंग्लंडचा 80वा कसोटी कर्णधार ठरला होता. पण 2022 मध्ये त्याने इंग्लंडचं कर्णधारपद सोडलं होतं.(फोटो-GETTY IMAGES)

जो रूटने इंग्लंडसाठी 65 कसोटी सामन्यात कर्णधारपद भूषवलं ठआहे. त्यापैकी 27 सामन्यात विजय आणि 27 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी जिंकणारा कर्णधार आहे. (फोटो-GETTY IMAGES)

जो रूटने कर्णधार म्हणून इंग्लंडसाठी चांगली कामगिरी केली आहे. त्याने 46.71 च्या सरासरीने 5418 धावा केल्या आहेत. यात त्याने 15 शतकं ठोकली आहेत. (फोटो-GETTY IMAGES)