
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. पहिल्या टी20 सामन्यात त्याने 68 धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याचं अर्धशतक 5 धावांनी हुकलं. त्याने 30 चेंडूत 2 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 45 धावा केल्या.

जोस बटलरने या खेळीसह भारताविरुद्ध एक मोठा विक्रम नोंदवला आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. जो बटलरने 24 आंतरराष्ट्रीय सामन्यात एकूण 604 धावा केल्या आहेत.

वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनने भारताविरुद्ध 592 धावा केल्या आहेत. मात्र त्याला मागे टाकत जोस बटलर 600 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. ग्लेन मॅक्सवेल 574 धावांसह तिसऱ्या, डेविड मिलर 524 धावांसह चौथ्या आणि 500 धावांसह आरोन फिंच पाचव्या स्थानावर आहे.

जोस बटलरने भारताविरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यात तीन षटकार मारले. यासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 षटकार पूर्ण केले आहेत. अशी कामगिरी करणारा इंग्लंडचा पहिला फलंदाज ठरला आहे. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांचा यादीत रोहित शर्मा आघाडीवर आहे. त्याने 200 षटकार मारले आहेत.

जोस बटलरने इंग्लंडसाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी 2011 मध्ये पदार्पण केलं होतं. त्याने इंग्लंडसाठी 130 टी20 सामने खेळला असून 3502 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि 26 अर्धशतक ठोकले आहेत.