केएल राहुलने 500 चौकारांसह रचला नवा विक्रम, आयपीएल स्पर्धेत अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू
आयपीएल 2026 स्पर्धेतील 51वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. या सामन्यात केएल राहुलने 23 धावांची खेळी केली आणि एक विक्रम आपल्या नावावर केला.

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 51व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने आले आहे. हा सामना दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये होत आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना केएल राहुलने एक मोठा विक्रम रचला. (PHOTO CREDIT- PTI)

केएल राहुल 250 वा टी20 सामना खेळत आहे. त्याने या सामन्यात 14 चेंडूंचा सामना केला आणि 23 धावा करून बाद झाला. त्याने या डावात 4 चौकार मारले. यासह आयपीएल स्पर्धेतील एका खास विक्रमाच्या यादीत स्थान मिळवलं आहे. (PHOTO CREDIT- PTI)

केएल राहुलने चार चौकार मारले आणि आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात 500 चौकार पूर्ण केले. आयपीएल स्पर्धेत अशी कामगिरी करणारा सातवा खेळाडू ठरला. यासह त्याने आयपीएल स्पर्धेत 232 षटकारही मारले आहेत. (PHOTO CREDIT- PTI)

केएल राहुलने या छोट्या खेळीसह दिल्ली कॅपिटल्ससाठी 1000 धावाही पूर्ण केल्या. त्याने ही कामगिरी 23 डावात पूर्ण केली. दिल्लीकडून सर्वात वेगाने 1000 धावा करणारा खेळाडू ठरला. (PHOTO CREDIT- PTI)

केएल राहुलने यापूर्वी पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्ससाठी 1000 धावा केल्या आहेत. आता आयपीएल स्पर्धेत 3 वेगवेगळ्या फ्रेंचायझीसोबत 1000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. (PHOTO CREDIT- PTI)