IND vs AUS : केएल राहुलवर अर्शदीप सिंगच्या हातापाया पडण्याची वेळ! असं का ते स्वत:च केला खुलासा

भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात टी20 मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये फार काही बदल होईल असं वाटत नाही. त्याच प्लेइंग 11 सह टीम इंडिया मैदानात उतरली तर अर्शदीप सिंगला बेंचवर बसणं भाग आहे. असं असताना या सामन्यापूर्वी केएल राहुलने अर्शदीपबाबत मोठा खुलासा केला आहे. काय ते जाणून घ्या.

| Updated on: Oct 30, 2025 | 8:29 PM
1 / 5
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या टी20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. पण या सामन्यात अर्शदीप सिंगला काही संधी मिळाली नाही. त्याच्या जागी संघात हार्षित राणाला प्राधान्य देण्यात आलं. आता दुसऱ्या टी20 सामन्यातही तसंच चित्र असण्याची शक्यता आहे. (Photo- PTI)

2 / 5
हार्षित राणा ऑस्ट्रेलियातील उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर आखुड टप्प्याची गोलंदाजी करण्याची क्षमता ठेवतो. त्यामुळे अर्शदीपऐवजी हार्षित राणाला संधी दिली जात आहे. त्यामुळे दुसर्‍या टी20 सामन्यातही हार्षित राणाला प्राधान्य असेल यात काही शंका नाही. (Photo- PTI)

3 / 5
अर्शदीप सिंग मेलबर्नमध्ये प्लेइंग 11 मध्ये असेल की नाही याबाबत नाणेफेकीचा कौल झाल्यानंतरच कळेल. पण केएल राहुलने त्याच्याबाबत एक मनोरंजक खुलासा केला आहे. अर्शदीप सिंगला गप्प करण्यासाठी विनवणी करावी लागते असा खुलासा केएल राहुलने केला. (Photo- PTI)

4 / 5
"जेव्हा अर्शदीप टीम इंडियामध्ये आला तेव्हा तो अजिबात बोलत नव्हता. मला वाटायचे की त्याच्यात कोणताही एटीट्यूड नाही, पण आता मी त्याला गप्प करण्याचा प्रयत्न करून थकलो आहे, पण तो थांबत नाही.", असं केएल राहुल म्हणाला. (Photo- PTI)

5 / 5
अर्शदीप सिंगचा स्वभाव कसा आहे हे सोशल मीडियावरून लक्षात येतं. आशिया कप स्पर्धेदरम्यान त्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. इतकंच काय तर अर्शदीप सोशल मीडियावरही सक्रिय असतो. त्यामुळे अर्शदीप ड्रेसिंग रूममध्ये काय उच्छाद मांडत असेल याचा अंदाज क्रीडाप्रेमी बांधत आहेत. (Photo- PTI)