IPL 2026 स्पर्धेपूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय, चूक सुधारत केएल राहुलवर टाकली मोठी जबाबदारी

दिल्ली कॅपिटल्सचं आयपीएल जेतेपदाचं स्वप्न अजूनही अपूर्ण आहे. मागच्या वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला यश मिळालं. पण अद्यापही या स्पर्धेतील काही फ्रेंचायझी जेतेपदापासून दूर आहेत. त्यापैकी एक म्हणजे दिल्ली कॅपिटल्स.. यंदा जेतपदाचं स्वप्न उराशी फ्रेंचायझीने एक बदल केला आहे.

| Updated on: Mar 17, 2026 | 8:18 PM
1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेसाठी दहा फ्रेंचायझी सज्ज झाल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सने देखील तयारी सुरू केली आहे. पहिल्या जेतेपदाचं स्वप्न उराशी बाळगून रणनिती आखली जात आहे. असं असताना दिल्ली कॅपिटल्सने केएल राहुलबाबत मोठा निर्णय घेतला आहे.  (Photo- BCCI/IPL)

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी दहा फ्रेंचायझी सज्ज झाल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सने देखील तयारी सुरू केली आहे. पहिल्या जेतेपदाचं स्वप्न उराशी बाळगून रणनिती आखली जात आहे. असं असताना दिल्ली कॅपिटल्सने केएल राहुलबाबत मोठा निर्णय घेतला आहे. (Photo- BCCI/IPL)

2 / 5

आयपीएल 2025 स्पर्धेतील चुकांमधून धडा घेत दिल्ली कॅपिटल्सने एक महत्त्वाचा बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्सने केएल राहुलला या स्पर्धेत सलामीवीर म्हणून उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच या पर्वात केएल राहुल ओपनिंग करणार आहे. (Photo- BCCI/IPL)

3 / 5

केएल राहुल दिल्ली कॅपिटल्स संघासाठी ओपनर म्हणूनच नाही तर विकेटकीपर म्हणून भूमिका बजावणार आहे. अक्षर पटेलच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सने या दोन निर्णयांवर शिक्कामोर्तब केलं आहे. मागच्या पर्वातील सुरूवातीच्या 11 सामन्यात केएल राहुल मधल्या फळीत खेळला होता. (Photo- BCCI/IPL)

4 / 5

आयपीएलच्या मागच्या पर्वात केएल राहुल दिल्ली कॅपिटल्ससाठी प्रभावी फलंदाज ठरला होता. त्याने 13 सामन्यात 149.72 च्या स्ट्राईक रेटने 539 धावा केल्या होतेया. यात गुजरात टायटन्सविरुद्ध 65 चेंडूत 112 धावांची खेळी महत्त्वाची ठरली होती. (Photo- BCCI/IPL)

5 / 5

दिल्ली कॅपिटल्सला आयपीएल 2026 स्पर्धेतही केएल राहुलकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. त्यामुळे त्याला ओपनिंग उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. आता या पर्वात तरी दिल्ली कॅपिटल्सचं जेतेपदाचं स्वप्न पूर्ण होणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Photo- BCCI/IPL)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us