
आयपीएलच्या इतिहासातील निच्चांकी धावसंख्येचा विक्रम हा आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या नावावर आहे. कोलकाता नाईट रायडर्सने आरसीबीला 2017 साली 49 धावांवर गुंडाळलं होतं.

आयपीएलच्या इतिहासातीस पहिला विजेता संघ राजस्थान रॉयल्स या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. आरसीबीने राजस्थानचा डाव 58 धावांवर आटोपला होता.

तिसऱ्या स्थानीही राजस्थान रॉयल्स विराजमान आहे. आरसीबीनेच राजस्थानला 2023 मध्ये 59 धावावंर ऑलआऊट केलं होतं.

मुंबई इंडियन्सने 2017 साली दिल्ली कॅपिट्ल्सला 66 धावांवर रोखलं होतं. आयपीएलच्या इतिहासातील ही चौथी निच्चांकी धावसंख्या ठरली होती.

पाचव्या स्थानी पुन्हा दिल्ली कॅपिट्ल्सचाच नंबर आहे. पंजाब किंग्सने 2017 साली दिल्लीचा डाव 67 धावांवर आटोपला होता.