PBKS vs LSG : श्रेयस अय्यरची मॅचविनिंग खेळी, लखनौविरुद्ध मोठा रेकॉर्ड ब्रेक

Shreyas Iyer Most Sixes in IPL as a Captain : श्रेयस अय्यरने लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात मंगळवारी 1 एप्रिलला 52 धावांची स्फोटक खेळी केली. श्रेयसने या खेळीसह कर्णधार म्हणून एका विक्रमाला गवसणी घातली आहे.

| Updated on: Apr 02, 2025 | 6:33 PM
1 / 5
पंजाब किंग्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 13 व्या सामन्यात धमाकेदार कामगिरी केली. पंजाबने लखनौ सुपर जायंट्सवर 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. श्रेयस अय्यर याने कर्णधार म्हणून शानदार बॅटिंग केली. (Photo Credit : IPL/BCCI)

2 / 5
श्रेयस अय्यरने नाबाद अर्धशतकी खेळी केली. श्रेयसने 30 बॉलमध्ये 52 धावा केल्या. श्रेयसने या खेळीत 3 चौकार 4 षटकार ठोकले. (Photo Credit : IPL/BCCI)

3 / 5
अय्यरने या खेळीसह एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. श्रेयस आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्स ठोकणारा सातवा कर्णधार ठरला आहे. (Photo Credit : IPL/BCCI)

4 / 5
श्रेयस अय्यरने कर्णधार म्हणून षटकार लगावण्याबाबत अनेक दिग्ग्जांना मागे टाकलं आहे. अय्यरने एडन गिलख्रिस्टला पछाडलं आहे.  (Photo Credit : Shreyas Iyer X Account)

5 / 5
श्रेयस अय्यरने आतापर्यंत आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून 83 षटकार लगावले आहेत. या यादीत महेंद्रसिंह धोनी पहिल्या स्थानी आहे. धोनीच्या नावावर 218 सिक्सची नोंद आहे. (Photo Credit : Shreyas Iyer X Account)