Mitchell Marsh: मिचेल मार्शचं फायर शतक, आरसीबी विरुद्ध शतकांचा पाऊस, इतके विक्रम
Mitchell Marsh Milestone, IPL 2026 LSG vs RCB: लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील आपल्या दहाव्या सामन्यात पहिल्यांदा 200 पार मजल मारली. लखनौला 200 पार पोहचवण्यात मिचेल मार्शने याने प्रमुख भूमिका बजावली.

लखनौ सुपर जायंट्सचा ओपनर बॅट्समन मिचेल मार्श याने आरसीबी विरुद्ध शतक झळकावलं. मार्शचं आयपीएल कारकीर्दीतील हे दुसरं शतक ठरलं. मार्शने 49 बॉलमध्ये शतक आणि 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. (PC-PTI)

मार्शने आरसीबी विरुद्ध 111 धावांची खेळी केली. मार्शने या खेळीत 9 षटकार लगावले. मार्शने जोश हेझलवूड याची धुलाई केली. तसेच कृणाल पंड्या, रसीक डार आणि सूर्यश शर्मा यांच्या बॉलिंगवर षटकार ठोकले. (PC-PTI)

मार्श लखनौसाठी सातत्याने धावा करतोय. मार्श लखनौसाठी गेल्या 2 मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांपैकी एक आहे. मार्शने सर्वाधिक 57 षटकार आणि 83 चौकार लगावले आहेत. (PC-PTI)

मिचेल मार्श लखनौसाठी सर्वाधिक वेळा 50 पेक्षा अधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. मार्शने गेल्या 2 मोसमात 9 वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. (PC-PTI)

मार्शसाठी लखनौ सुपर जायंट्सने 3 कोटी 40 लाख रुपये मोजले आहेत. मार्शने आतापर्यंत आयपीएल कारकीर्दीत 64 सामन्यांमध्ये 2 शतकांसह 1500 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तसेच मार्शने 37 विकेट्सही मिळवल्या आहेत. (PC-PTI)