महेंद्रसिंह धोनी आयपीएल करिअरचा शेवटचा सामना या दिवशी खेळणार! नव्या दाव्याने उडाली खळबळ
आयपीएल 2026 स्पर्धा सुरू असताना क्रीडाप्रेमींना महेंद्रसिंह धोनीची प्रतीक्षा आहे. आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत धोनी एकही सामना खेळलेला नाही. आता महेंद्रसिंह धोनीबाबत आणखी दावा करण्यात आला आहे.

आयपीएल 2026 स्पर्धा सुरू असून महेंद्रसिंह धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचं पर्व असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफच्या एका दाव्याने खळबळ उडाली आहे. महेंद्रसिंह धोनी या पर्वातील शेवटचा सामना 18 मे रोजी खेळेल असा अंदाज वर्तवला आहे. चेन्नई सुपर किंग्स या दिवशी घरच्या मैदानावर शेवटचा सामना खेळणार आहे. (Photo: IPL/BCCI)

मोहम्मद कैफने सांगितलं की, 'मला वाटतं की महेंद्रसिंह धोनी चेन्नई सुपर किंग्ससाठी शेवटचा सामना 18 मे रोजी खेळेल. मला वाटते की तो सुरूवातीपासून खेळू इच्छित नव्हता. त्याला खेळण्याची इच्छा नव्हती हे पहिल्यापासून दिसत होतं.' (Photo: IPL/BCCI)

मोहम्मद कैफने सांगितलं की, 'नेटवर धोनी विकेटकीपिंग करत आहे. फलंदाजीही करत आहे. टीम मीटिंगमध्ये बसण्याचा त्याचा प्लान होता. टीमसोबत राहण्याची रणनिती होती. मला वाटतं की तो आता नाही खेळणार. कदाचित 18 मे रोजी खेळताना दिसू शकतो. कारण चेन्नई सुपर किंग्सचा हा शेवटचा घरच्या मैदानावरील सामना आहे.' (Photo: IPL/BCCI)

चेन्नई सुपर किंग्सने धोनीशिवाय खेळणं आत्मसात केलं आहे. त्याच्या जागी संजू सॅमसन विकेटकीपिंग करत आहे. तसेच आक्रमक फलंदाजीही करत आहे. संघात कार्तिक शर्मासारखा फलंदाज आहे. त्याने सलग दोन सामन्यात विजय मिळवून दिला. (Photo: IPL/BCCI)

महेंद्रसिंह धोनी आयपीएल स्पर्धेत 278 सामने खेळला आहे. त्याने 38.3 च्या सरासरीने 5439 धावा केल्या आहेत. धोनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 24 अर्धशतकं ठोकली आहेत. तसेच 264 षटकार मारले आहेत. (Photo: IPL/BCCI)