रोहित शर्माने 81 धावा करून आयपीएलमध्ये रचला इतिहास, काय केलं ते वाचा

मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या एलिमिनेटर सामन्यात रोहित शर्माची फलंदाजी चर्चेचा विषय ठरली. या सामन्यात रोहित शर्माने 81 धावा केल्या आणि काही विक्रम आपल्या नावावर केले. यात प्लेऑफमध्ये मुंबई इंडियन्ससाठी मोठा विक्रम होता.

| Updated on: May 30, 2025 | 11:25 PM
1 / 5
मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने गुजरात टायटन्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात 81 धावांची खेळी केली. यासह त्याने आपल्या नावावर एक खास विक्रम रचला आहे. त्याच्या आक्रमक खेळीमुळे मुंबई इंडियन्सला 228 धावांपर्यंत मजल मारता आली. (Photo- IPL/BCCI)

2 / 5
गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने 4 षटकार आणि 9 चौकार मारले. यासह रोहित शर्माने या हंगामात चौथ्यांदा 50 पेक्षा जास्त धावा केल्या. (Photo- IPL/BCCI)

3 / 5
आयपीएल प्लेऑफमध्ये रोहित शर्माने एवढी मोठी खेळी खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. 81 धावा ही त्याची प्लेऑफमधील सर्वोच्च खेळी आहे. प्लेऑफमधील मुंबई इंडियन्ससाठी ही सर्वोत्तम खेळी आहे. यापूर्वी, हा विक्रम सूर्यकुमार यादवच्या नावावर होता. त्याने 2019 मध्ये चेन्नईविरुद्ध नाबाद ७१ धावा केल्या होत्या. (Photo- IPL/BCCI)

4 / 5
रोहित शर्माने या अर्धशतकी खेळीसह आयपीएलमध्ये 7000 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा हा आयपीएलमध्ये 7000 पेक्षा जास्त धावा करणारा विराट कोहलीनंतर दुसरा खेळाडू आहे. (Photo- IPL/BCCI)

5 / 5
रोहित शर्माने आयपीएलमध्ये 300 षटकार पूर्ण केले आणि ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. ख्रिस गेलने आयपीएलमध्ये 357 षटकार मारले आहेत. तर भारतीय दिग्गज विराट कोहली 291  षटकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे. (Photo- IPL/BCCI)