कसोटी फॉरमेटमधून निवृत्ती आता इंग्लंड संघासाठी खेळणार विराट कोहली? नेमकं काय ते जाणून घ्या

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारत इंग्लंड कसोटी मालिकेत खेळणार नाही हे निश्चित आहे. असं असताना एका रिपोर्टनुसार, इंग्लंडने त्याच्यासोबत करार करण्यास रूची दाखवली आहे.

| Updated on: May 17, 2025 | 11:10 PM
1 / 5
विराट कोहलीनी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. इंग्लंड दौऱ्यापूर्वी त्याने निवृत्ती घेतल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पण आता विराट कोहली इंग्लंडकडून खेळताना दिसू शकतो. तुम्हाला हे वाचून धक्का बसला ना.. पण संपूर्ण बातमी वाचल्यावर तुम्हाला नेमकं काय ते कळेल. (फोटो- पीटीआय)

2 / 5
विराट कोहलीला इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाकडून नाही तर काउंटी टीममध्ये खेळताना दिसू शकतो. इंग्लंडची काउंटी टीम मिडिलसेक्सने विराट कोहलीला संघात घेण्यास रुची दाखवली आहे. विराट कोहलीने काउंटी चॅम्पियनशिप किंवा कमीत कमी वनडे कपमध्ये खेळवं अशी  फ्रेंचायझीची इच्छा आहे.  (फोटो- पीटीआय)

3 / 5
भारताचे अनेक खेळाडू काउंटी क्रिकेटमध्ये खेळले आहेत. सचिन तेंडुलकरही यॉर्कशायरकडून खेळला आहे. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि करुण नायर इंग्लंड काउंटी क्रिकेटमध्ये खेळत आहेत. पण विराट कोहली अजूनही काउंटी क्रिकेटचा भाग नाही.  (फोटो- पीटीआय)

4 / 5
2018 मध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी सरे संघासोबत करार केला होता. पण मानेला झालेल्या दुखापतीमुळे करार रद्द करण्यात आला. पण आता काउंटी संघ मिडलसेक्सचे क्रिकेट संचालक अॅलन कोलमन यांनी विराट कोहलीचे कौतुक केले आहे आणि त्याला आपल्या संघात समाविष्ट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  (फोटो- पीटीआय)

5 / 5
विराट कोहली अजूनही बीसीसीआयच्या केंद्रीय कराराचा भाग आहे. सध्या आयपीएलमध्येही खेळतो, त्यामुळे तो टी20  ब्लास्ट किंवा द हंड्रेड सारख्या विदेशातील स्थानिक टी20 लीगमध्ये भाग घेऊ शकत नाही. पण तो काउंटी चॅम्पियनशिप (प्रथम श्रेणी) किंवा मेट्रो बँक कप (एकदिवसीय) मध्ये खेळू शकतो.  (फोटो- पीटीआय)