अभिषेक शर्माच्या फोटोचा चुकीचा वापर, दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय
अभिषेक शर्माने फोटोच्या गैरवापराप्रकरणी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर अभिषेक शर्माची अडचण कायमची सोडवण्यासाठी दिल्ली हायकोर्टाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. नेमकं काय प्रकरण आहे ते जाणून घेऊयात..

टिम इंडियाचा स्टार फलंदाज अभिषेक शर्मा याला अखेर दिल्ली हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सोशल मीडियावर त्याच्या फोटोचा, नावाचा आणि स्टारडमचा गैरवापर केला जात असल्याने संताप झाला होता. त्यामुळे चुकीचा कंटेंट हटवण्यासाठी त्याने कोर्टात धाव घेतली होती. यावर दिल्ली हायकार्टाने मोठा निर्णय दिला आहे. (Photo: BCCI)

दिल्ली हायकोर्टाने अभिषेक शर्माचे फोटो, नाव आणि ओळखीचा गैरवापर करणाऱ्या सोशल मिडिया पोस्ट आणि ऑनलाइन लिक्स हटवण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात औपचारिक आदेश जारी केला जाईल, दिल्ली हायकोर्टाने सांगितलं. (Photo: BCCI)

अभिषेक शर्मा याने आपल्या पर्सनालिटी राइट्सच्या सुरक्षेसाठी कोर्टात धाव घेतली होती. अभिषेक शर्माने कोर्टात या प्रकरणी खटला दाखल केला होता. तसेच लोकं त्याच्या फोटोचा, नावाचा आणि ओळखीचा परवानगी न घेता चुकीचा आणि व्यवसायिक वापर करत आहेत. (Photo: BCCI)

अभिषेक शर्मा इंग्लंडमध्ये टी20 मालिका खेळत आहे. त्याने पहिल्या दोन सामन्यात चांगली कामगिरी केली. पण संघ काही जिंकू शकला नाही. तिसऱ्या सामन्यात त्याने निराशा केली. त्यात टीम इंडियाचा दारूण पराभव झाला. आता टीम इंडियावर मालिका गमवण्याची वेळ आली आहे. (Photo: BCCI)

अभिषेक शर्मा आता ब्रिस्टलमध्ये आपल्या आक्रमक शैलीने फलंदाजी करण्यास सज्ज झाला आहे. हा सामना टीम इंडियासाठी करो या मरोची लढाई आहे. हा सामना गमावला तर इंग्लंड ही मालिका जिंकेल. भारताने यापूर्वी आयर्लंडविरुद्ध मालिका गमावली आहे. (Photo: BCCI)