
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील तीन सामने पार पडले असून 2-1 अशी आघाडी इंग्लंडने घेतली आहे. त्यामुळे चौथा सामना भारतासाठी करो या मरोची लढाई आहे. (Photo- BCCI)

भारत आणि इंग्लंड यांच्या चौथा कसोटी सामना 23 जुलैपासून सुरु होणार आहे. या सामन्यात मोहम्मद सिराजकडे एक विक्रम रचण्याची संधी आहे . या सामन्यात चांगली कामगिरी केली तर अनिल कुंबळेचा विक्रम नावावर करू शकतो. (Photo- BCCI)

भारतकडून इंग्लंडमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा मान इशांत शर्माकडे आहे. त्याने 2011 ते 2021 या कालावधीत 15 कसोटीत 51 विकेट घेतले आहे. दुसऱ्या क्रमांकावर जसप्रीत बुमराह आहे. त्याने 49 विकेट घेतल्या आहे. कपिल देवच्या नावावर 43, मोहम्मद शमीच्या नावावर 42, तर कुंबळेच्या नावावर 36 विकेट आहेत. (Photo- BCCI)

मोहम्मद सिराज अनिल कुंबळेचा विक्रम मोडू शकतो. यासाठी त्याला फक्त एका विकेटची गरज आहे. कारण सिराजने 9 कसोटी सामन्यात 36 विकेट घेतल्या आहेत. सध्या दोघंही बरोबरीत आहे. पण सिराजला दोन कसोटीत मोठी संधी आहे. (Photo- BCCI)

चौथ्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराज प्लेइंग 11 चा भाग असेल यात काही शंका नाही. पहिल्या कसोटीत त्याने 2 विकेट घेतल्या होत्या. दुसऱ्या कसोटीत त्याने 7 विकेट, तिसऱ्या कसोटी 4 विकेट घेतल्या होत्या. आतापर्यंत तीन कसोटी त्याने 13 विकेट घेतल्या आहेत.(Photo- BCCI)