
विराट कोहली याने काही दिवसांपूर्वी टेस्ट क्रिकेटमधून निवृ्त्ती घेतली. विराटने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली. विराटने 14 वर्षांच्या कारकीर्दीत अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले. विराटच्या नाववर कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक द्विशतकं करण्याचा विक्रम आहे. (Photo Credit : Icc X Account)

विराट कोहली याने 123 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. विराटने या 123 सामन्यांमध्ये 46.85 च्या सरासरीने 9 हजार 230 धावा केल्या आहेत. विराटने या दरम्यान 31 अर्धशतकं, 30 शतकं आणि 7 द्विशतकं केली आहेत. (Photo Credit : Icc X Account)

टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग दुसऱ्या स्थानी आहे. सेहवागने 103 सामन्यांमध्ये 8 हजार 503 धावा केल्या आहेत. सेहवागने कसोटी कारकीर्दीत 31 अर्धशतकं, 23 शतकं आणि 6 द्विशतकं झळकावली आहेत. (Photo Credit : Icc X Account)

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सर्वाधिक 200 कसोटी सामने खेळले आहेत. सचिनने 53.78 च्या सरासरीने 15 हजार 921 धावा केल्या. सचिनने या दरम्यान 68 अर्धशतकं, 51 शतकं आणि 6 द्विशतकं लगावली. (Photo Credit : Icc X Account)

माजी कर्णधार राहुल द्रविड याने त्याच्या कसोटी कारकीर्दीत 5 वेळा डबल सेंच्युरी करण्याचा कारनामा केला. द्रविड टीम इंडियासाठी 163 कसोटी सामने खेळला. द्रविडने 52.63 च्या सरासरीने 13 हजार 265 धावा केल्या. द्रविडने या दरम्यान 63 अर्धशतकं आणि 36 शतकं लगावली. (Photo Credit : Icc X Account)

लिटिल मास्टर, दिग्गज माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी भारतासाठी 125 कसोटी सामने खेळले. गावसकर यांनी 51.12 च्या सरासरीने 10 हजार 122 धावा केल्या. गावसकरांनी 4 द्विशतकं, 34 शतकं आणि 45 अर्धशतकं झळकावली. (Photo Credit : Icc X Account)