16 वर्षांनी मुंबई इंडियन्स फ्रँचायझी अंतिम फेरीत पराभूत, झालं असं की…

आंतरराष्ट्रीय लीग टी20 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात डेझर्ट वायपर्सने एमआय एमिरेट्सचा पराभव केला. त्यांनी किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखालील एमआय संघाचा पराभव केला. यासह मुंबई इंडियन्स फ्रँचायझीची विजयी मालिकाही संपुष्टात आली आहे.

| Updated on: Jan 05, 2026 | 10:19 PM
1 / 5
आंतरराष्ट्रीय टी20 लीग स्पर्धेत नवीन चॅम्पियन सापडला आहे. 4 जानेवारी 2025 च्या रात्री दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या ILT20 फायनलमध्ये सॅम कुरनच्या नेतृत्वाखालील डेझर्ट वायपर्सने एमआय एमिरेट्सचा 46 धावांनी पराभव करून इतिहास रचला. (Photo- MI Emirates Twitter)

2 / 5
मुंबई इंडियन्स टी20 क्रिकेट लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फ्रँचायझी आहे. कारण या फ्रँचायझीने आतापर्यंतच्या प्रत्येक लीगमध्ये विजेतेपद जिंकले आहे. मुंबई इंडियन्सला जगातील प्रमुख लीगमध्ये ट्रॉफी जिंकणारी जगातील एकमेव फ्रँचायझी होण्याचा मान देखील मिळाला आहे. (Photo- MI Emirates Twitter)

3 / 5
गेल्या 16 वर्षांत मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने १२ फायनल खेळले आहेत. या काळात त्यांना फक्त एकदाच पराभव पत्करावा लागला आहे. तोही आंतरराष्ट्रीय लीग टी20 स्पर्धेत. डेझर्ट वायपर्स अंतिम फेरीत मुंबई इंडियन्स फ्रँचायझीला हरवणारा पहिला संघ बनला. (Photo- MI Emirates Twitter)

4 / 5
2008 पासून लीग स्पर्धेत भाग घेणाऱ्या मुंबई इंडियन्सने चॅम्पियन्स लीग टी20 स्पर्धेत 2011 साली पहिलं जेतेपद मिळवलं. जिंकला. २०१३ मध्येही चॅम्पियन्स लीग ट्रॉफी जिंकण्यात यश आले. 2013 मध्ये आयपीएलमध्ये पहिला जेतेपद मिळवलं. त्यानंतर 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये ट्रॉफी जिंकण्यात यश मिळवले आहे.(Photo- MI Emirates Twitter)

5 / 5
2023 मध्ये डब्ल्यूपीएल, मेजर लीग क्रिकेट 2023, आंतरराष्ट्रीय लीग टी20 2024, दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० लीगमध्ये मुंबई इंडियन्सनेही आपले ट्रॉफी खाते उघडले आहे. (Photo- MI Emirates Twitter)