AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारी कर्मचाऱ्यांना सर्वात मोठी खुशखबर, महागाई भत्त्यात तब्बल इतकी वाढ, बँक खाते होणार फुल्ल!

राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर दिली आहे. सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे. या निर्णयाचा फायदा सव्वा आठ लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना सर्वात मोठी खुशखबर, महागाई भत्त्यात तब्बल इतकी वाढ, बँक खाते होणार फुल्ल!
government employees da increasedImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 25, 2026 | 5:21 PM
Share

Government Employees DA Increased : गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना म्हणजेच सरकारी नोकरी करणाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता नेमका कधी मिळणार? असे विचारले जात होते. दरम्यान, आता राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी तसेच पात्र कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर मिळालेली आहे. आता सरकारने अशा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे तशी माहिती वित्त राज्यमंत्री आशिस जयस्वाल यांनी सांगितले आहे. या निर्णयानुसार आता महागाई भत्ता 55 टक्क्यांवरून 58 टक्के करण्यात येणार आहे.

थकबाकीची रक्कमही दिली जाणार

वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानपरिषदेत तसे निवेदन सादर केले आहेयासंदर्भात वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आज विधान परिषदेत निवेदन सादर केले. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. महागाई भात्यातील ही वाढ जुलै २०२५ पासून लागू करण्यात येणार आहे. जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीतील थकबाकीची रक्कम मार्च २०२६ मध्ये अदा करण्यात येईल. तसेच नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येणार आहे.

सव्वा आठ लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा

सरकारने दिलेल्या माहितीनुसार या निर्णयाचा लाभ सुमारे ५.९६ लाख कार्यरत शासकीय कर्मचारी तसेच ८.१२ लाख निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक बळ मिळून त्यांच्या कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. हा निर्णय घेतल्यानंतर राज्य शासन कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून राज्यातील सर्व घटकासोबत राज्य शासनाच्या आर्थिक सुरक्षिततेस ही प्राधान्य देत असल्याचे वित्त राज्य मंत्री आशिष जयस्वाल यांनी म्हटले.

दुसरीकडे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना ही खुशखबर मिळालेली असताना दुसरीकडे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठीही आठव्या वेतन आयोगाचे काम चालू झाले आहे. लवकरच आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...