PBKS vs MI: जसप्रीत बुमराहच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ घालताच मुंबई इंडियन्सच्या नावावर अनोखा विक्रम

आयपीएल 2026 स्पर्धेत पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाची जबाबदारी जसप्रीत बुमराहकडे सोपवण्यात आली आहे. हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादवच्या गैरहजेरीत हे नेतृत्व सोपवलं आहे. यासह मुंबई इंडियन्सच्या नावावर एक अनोखा विक्रम रचला गेला आहे.

| Updated on: May 14, 2026 | 8:20 PM
1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेत पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहकडे मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व सोपवलं.  जसप्रीत बुमराह या पर्वात मुंबई इंडियन्स संघाचा तिसरा कर्णधार आहे. यासह मुंबई इंडियन्स संघाच्या नावावर एक अनोखा विक्रम रचला गेला आहे. (Photo: PTI)

2 / 5
मुंबई इंडियन्स आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एकमेव संघ ठरला आहे की, दोन पर्वात 3-3 कर्णधार बदलले. यापूर्वी मुंबई इंडियन्सने 2008 मध्ये असं केलं होतं. या पर्वात हरभजन सिंग, शॉन पॉलक आणि सचिन तेंडुलकर कर्णधार होते. (Photo: PTI)

3 / 5
पुणे वॉरियर्सने 2013 मध्ये तीन कर्णधार बदलले होते. तेव्हा अँजेलो मॅथ्यूज, रॉस टेलर आणि एरॉन फिंच यांनी कर्णधारपदाची भूमिका बजावली होती. (Photo: PTI

4 / 5
आयपीएल 2021 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादने एका पर्वात तीन कर्णधार बदलले होते. डेविड वॉर्नरनंतर केन विल्यमसनकडे कर्णधारपद सोपवलं होतं. त्यानंतर मनीष पांडेने संघाचं नेतृत्व सांभाळलं होतं.  (Photo: BCCI/IPL)

5 / 5
पंजाब किंग्सने 2024 मध्ये तीन कर्णधार केले होते. शिखर धवननंतर सॅम करनकडे जबाबदारी सोपवली होती. त्याने जितेश शर्माने संघाची धुरा सांभाळली होती.  (Photo: BCCI/IPL)

Follow Us