मुशफिकुर रहीमने 100वा कसोटी सामना गाजवला, 148 वर्षांच्या इतिहासात 11 क्रिकेटपटूंना असं जमलं

Mushfiqur Rahim Century: बांगलादेशचा फलंदाज मुशफिकुर रहीमने 100व्या कसोटी सामन्यात कमाल केली. त्याच्या नावावर 100व्या कसोटी सामन्यात एक मोठा विक्रम रचला गेला आहे. आतापर्यंत कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी फक्त 11 खेळाडूंनाच जमली आहे.

Updated on: Nov 20, 2025 | 4:44 PM
1 / 5
बांग्लादेश आयर्लंड यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना ढाकामध्ये सुरु आहे. हा कसोटी सामना मुशफिकुर रहीमसाठी खास आहे. कारण त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील 100वा कसोटी सामना आहे. या कसोटी सामन्यात त्याने स्मरणात राहील अशी कामगिरी केली आहे. (Photo: PTI)

2 / 5
मुशफिकुर रहीमने 10व्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केली. कसोटी सामन्याच्या पहिल्या डावातील दुसऱ्या दिवशी त्याने ही कामगिरी केली. कसोटी कारकिर्दीतील 13वं शतक ठोकलं. पण इतर शतकांपेक्षा हे शतक खास होतं. कारण, हे शतक 100व्या कसोटीत आलं आहे. (Photo: PTI)

3 / 5
मुशफिकुर बांगलादेशसाठी 100 कसोटी सामने खेळणारा पहिला क्रिकेटपटू आहे. इतकंच काय तर 100व्या कसोटीत शतक ठोकणारा पहिला बांगलादेशी क्रिकेटपटू ठरला आहे. (Photo: PTI)

4 / 5
1877 सालापासून कसोटी क्रिकेटला सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत 148 वर्षात मुशफिकुर रहीम हा जगातील 11वा खेळाडू आहे. ज्याने 100 व्या कसोटीत शतकी खेळी केली आहे. (Photo: PTI)

5 / 5
कॉलिन काउड्रे, जावेद मियांदाद, गॉर्डन ग्रीनिज, एलेक स्टीवर्ट, इंजमाम उल हक, रिकी पॉन्टिंग, ग्रेम स्मिथ, हाशिम अमला, जो रूट आणि डेविड वॉर्नर यांनी मुशफिकुर रहीमच्या आधा कसोटी क्रिकेटच्या 100व्या सामन्यात शतकी खेळी केली होती. पाँटिंगने 100व्या कसोटीच्या दोन्ही डावात शतक ठोकलं होतं. तर वॉर्नरने 100व्या कसोटीत द्विशतक ठोकलं आहे. (Photo: PTI)