
वर्ल्डकपसाठीचा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा अंतिम सामना आज होतोय. दुपारी दोन वाजता या मॅचला सुरुवात होणार आहे. त्यामुळे क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साह आहे. भारताच्या विजयासाठी सदिच्छा दिल्या जात आहेत.

नागपूर जिल्ह्यात विश्वकप फायनलचा फिव्हर पाहायला मिळतोय. टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी आणि भारतीय संघाचा उत्साह वाढवण्यासाठी नागपूरकर एकत्र जमलेत.

भारतीय टीमच्या विजयासाठी क्रिकेटप्रेमींनी पूजा केलेली आहे. बॅटची पूजा यावेळी करण्यात आली. टीम इंडियाला सदिच्छा देण्यात आल्या.

नागपूर बुटीबोरीत क्रिकेटर्सकडून ‘विजयी भव’ पूजा करण्यात आली. तर अर्जुन संघटनेकडून विश्वकप फायनलची मॅच पाहण्यासाठी स्क्रिन लावण्यात येणार आहे. बॅंड पथक सज्ज आहे.

टीम इंडियाच्या जर्सी सारखे टी शर्ट आणि हातात तिरंगा घेऊन तरुण आज नागपुरातील ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत. शुभेच्छांचे फलक घेऊन हे तरूण टीम इंडियाला पाठिंबा दर्शवत आहेत.