
प्रत्येक भारतीयाच्या हृदयाची धडधड आता वाढत चालली आहे. कारण भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया हा अंतिम सामना सुरु व्हायला केवळ काही मिनिटं उरली आहेत.

अहमदाबादमधल्या ज्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होतोय. त्या स्टेडियम बाहेर क्रिकेटप्रेमींनी गर्दी केली आहे.

वर्ल्डकप फायनलच्या या सामन्यासाठी क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह आहे. भारतीय क्रिकेट टीमचा उत्साह वाढवण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली आहे.

इंडिया इंडियाच्या जयघोषाने अवघं अहमदाबाद शहर दुमदुमलं आहे. हे सगळे क्रिकेट चाहते टीम इंडियाला चिअरअप करत आहेत.

आज जिंकणार तर टीम इंडियाच...! विजयासाठी भारतीय संघाला ऑल द बेस्ट, असं म्हणत क्रिकेट रसिक रोहितच्या शिलेदारांना शुभेच्छा देत आहेत.