
न्यूझीलंडचा ऑलराउंडर आणि भारतीय वंशाचा खेळाडू रचीन रवींद्र याच्या फिटनेसबाबत हेड कोच गेरी स्टेड यांनी अपडेट दिली आहे. रचीन अजूनही पूर्णपणे फिट नसल्याचं स्टेड यांनी सांगितलं.

रचीन रवींद्र याला ट्राय सीरिजमध्ये कॅच घेताना अंदाज चुकल्याने बॉल थेट तोंडावर लागला होता. रचीन यामुळे रक्तबंबाळ झाला. त्यामुळे रचीनला मैदानाबाहेर जावं लागलं होतं.

रचीन न्यूझीलंड टीमसह सराव सत्रात सहभागी झाला होता. "आम्ही रचीनबाबत फार सतर्क आहोत. रचीन हळुहळु रिकव्हर होत आहे", अशी माहिती स्टेड यांनी दिली.

इंडिया टुडेनुसार, रचीनला डोकेदुखीचा त्रास असल्याचं स्टेड यांनी सांगितलं. मात्र रचीनला आराम असल्याचं म्हटलं जात आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आम्ही रचीनवर बारीक लक्ष ठेवून असल्याचं स्टेड यांनी सांगितलं. न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत ए ग्रुपमध्ये आहे. न्यूझीलंडचा या स्पर्धेतील पहिला सामना हा 19 फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.