
न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज डॅरेल मिचेल याने टीम इंडिया विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामन्यात शतक झळकावलं. डॅरेलने 131 चेंडूत 137 धावांची खेळी केली. डॅरेलने या खेळीत 15 चौकार आणि 3 षटकार लगावले. (PHOTO CREDIT- PTI)

डॅरेल मिचेल याने टीम इंडिया विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यातही शतक झळकावलं होतं. तसेच मिचेलचं हे टीम इंडिया विरुद्धचं एकूण चौथं एकदिवसीय शतक ठरलं. डॅरेलने या चारही शतकात किमान 130 धावा केल्या आहेत. डॅरेलने 137, 130, 134 आणि नाबाद 131 अशा धावा केल्या आहेत. (PHOTO CREDIT- PTI)

डॅरेलने यासह वर्ल्ड रेकॉर्ड केला. डॅरेल टीम इंडिया विरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये 4 वेळा 130 पेक्षा अधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. तसेच डॅरेल एकाच संघाविरुद्ध 4 एकदिवसीय शतकं लगावणारा चौथा फलंदाज ठरला आहे. (PHOTO CREDIT- PTI)

भारताच्या रोहित शर्मा याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध अशीच कामगिरी केलीय. तसेच सचिन तेंडुलकर याने कांगारुंविरुद्ध 5 वेळा 130 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. (PHOTO CREDIT- PTI)

डॅरेल मिचेल याने टीम इंडिया विरूद्धच्या या 3 सामन्यांच्या मालिकेत 2 शतकं आणि 1 अर्धशतकासह एकूण 352 धावा केल्या. डॅरेल यासह न्यूझीलंडसाठी कोणत्याही संघाविरूद्ध 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. (PHOTO CREDIT- PTI)