NZ vs WI: आयपीएल लिलावात नाकारलं, आता न्यूझीलंडच्या खेळाडूने द्विशतक ठोकत दिलं उत्तर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेत न्यूझीलंड आपला तिसरा कसोटी सामना खेळत आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना ड्रॉ झाला. तर दुसरा सामना न्यूझीलंडने जिंकला होता. आता तिसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा न्यूझीलंडने पकड मजबूत केली आहे.

| Updated on: Dec 19, 2025 | 4:16 PM
1 / 5
आयपीएल मिनी लिलावात 350हून अधिक खेळाडूंची नावं होती. यापैकी फक्त 77 खेळाडूंना भाव मिळाला.  न विकलेल्या खेळाडूंमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा माजी स्टार सलामीवीर डेवॉन कॉनवे याचंही नाव होतं. डेवॉन कॉनवेने आयपीएल 2026 च्या लिलावात 2 कोटी बेस प्राईससह उतरला होता. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात द्विशतकी खेळी करून फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं आहे. (Photo- BLACKCAPS Twitter)

2 / 5
कॉनवे वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी नाबाद परतला. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात त्याने शानदार फलंदाजी केली आणि त्याचे द्विशतक पूर्ण केले. 367 चेंडूत 31 चौकारांसह 227 धावा केल्या आणि बाद झाला.  (Photo- BLACKCAPS Twitter)

3 / 5
मिनी लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्सने त्याला रिलीज केलं होतं. त्याला पुन्हा संघात घेतील अशी अपेक्षा होती. पण फ्रेंचयाझींनी युवा खेळाडूंवर जास्त विश्वास टाकला. डेवॉन कॉनवेने 29 आयपीएल सामने खेळले आहेत. 11 अर्धशतकांसह 1080  धावा केल्या आहेत. त्याचा सर्वोच्च धावसंख्या ही नाबाद 92 धावांची खेळी आहे. (Photo- BLACKCAPS Twitter)

4 / 5
डेवॉन कॉनवेने त्याच्या कसोटी पदार्पणात द्विशतक झळकावल्यानंतर पहिल्यांदाच द्विशतक झळकावले. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे द्विशतक झळकावले आहे.डेवॉन कॉनवेने 318 चेंडूत 28 चौकारांसह दुसरे कसोटी द्विशतक पूर्ण केले. कॉनवेने यापूर्वी 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध पदार्पणात पूर्ण 200 धावा केल्या होत्या. (Photo- BLACKCAPS Twitter)

5 / 5
डेव्हॉन कॉनवेने त्याच्या कसोटी कारकिर्दीत सहा शतके झळकावली आहेत. यात दोन द्विशतकांचा समावेश आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्यांदाच तिहेरी आकडा गाठला. कॉनवेच्या शतकामुळे न्यूझीलंडने तिसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवरील आपली पकड मजबूत केली आहे. न्यूझीलंडने पहिल्या डावात 8 गडी गमवून 575 धावा केल्या आणि डाव घोषित केला. तर वेस्ट इंडिजने एकही गडी न गमावता 110 धावा केल्या आहेत. (Photo- BLACKCAPS Twitter)