IPL 2026: पंजाब किंग्सला सुरूवातीच्या सामन्यात धक्का! 2 कोटी रूपये देऊनही पत्नीसाठी खेळाडूची माघार

आयपीएल 2026 स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. पण स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच दिग्गज खेळाडूंच्या दुखापतीच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे फ्रेंचायझींचं गणित बिघडताना दिसत आहे. असं असताना या यादीत आता पंजाब किंग्सच्या लॉकी फर्ग्युसनचं नाव जोडलं गेलं आहे.

| Updated on: Mar 20, 2026 | 4:53 PM
1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेला सुरूवात होण्याआधीच खेळाडू बाहेर पडण्याचं सत्र सुरू झालं आहे. बाहेर पडणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं वेगवेगळं कारण आहे. काही खेळाडू या संपूर्ण पर्वात खेळणार नाहीत. तर काही खेळाडू सुरूवातीच्या टप्प्यात.. असं असताना पंजाब किंग्सला असाच धक्का बसला आहे. (Photo: PTI)

आयपीएल 2026 स्पर्धेला सुरूवात होण्याआधीच खेळाडू बाहेर पडण्याचं सत्र सुरू झालं आहे. बाहेर पडणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं वेगवेगळं कारण आहे. काही खेळाडू या संपूर्ण पर्वात खेळणार नाहीत. तर काही खेळाडू सुरूवातीच्या टप्प्यात.. असं असताना पंजाब किंग्सला असाच धक्का बसला आहे. (Photo: PTI)

2 / 5

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन पत्नीच्या मदतीसाठी आयपीएल 2026 स्पर्धेच्या सुरूवातीच्या टप्प्यात खेळणार नाही. त्याने हा निर्णय पंजाब किंग्सला कळवला आहे. प्रीति जिंटा सहमालकिन असलेल्या पंजाब किंग्सने या पर्वात लॉकी फर्ग्युसनला 2 कोटी रूपये मोजून रिटेन केलं आहे. (Photo: PTI)

3 / 5

ईएसपीएनक्रिकइंफोच्या मते, दक्षिण अफ्रिकेविरूद्ध टी20 मालिका संपल्यानंतर लॉकी फर्ग्युसन काही आठवड्यांसाठी ब्रेक घेण्याच्या विचारात आहे. तो आपल्या कुटुंबियांना वेळ देऊ इच्छित आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध तिसरा टी20 सामना सुरू होण्यापूर्वी त्याने सांगितलं की, आताच घरी बाळ जन्माला आलं आहे. अशा स्थितीत घरी जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा विचार आहे. या दरम्यान पत्नीची मदत करण्याचा प्रयत्न करेन. (Photo: PTI)

4 / 5

आयपीएल 2026 स्पर्धेतील सुरूवातीचा टप्पा पार पडल्यानंतर लॉकी फर्ग्युसन पंजाब किंग्समध्ये परतण्याची शक्यता आहे. पण लॉकी फर्ग्युसनने असं आधीही केलं होतं. मागच्या पर्वातही त्याने पंजाब किंग्ससाठी सर्व सामने खेळले नव्हते. (Photo: PTI)

5 / 5

आयपीएल 2025 स्पर्धेत दुखापतीमुळे फक्त 4 सामने खेळला होता. त्यात त्याने 4 विकेट घेतल्या होत्या. पंजाब किंग्ससाठी त्याचं पहिलंच पर्व होतं. मेगा लिलाव 2025 मध्ये त्याच्यासाठी 2 कोटी पंजाब किंग्सने मोजले होते. तर यंदाच्या पर्वात त्याला रिटेन केलं आहे. (Photo: PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us