Asia Cup 2025 मधून टीम इंडियाच्या 6 खेळाडूंचा पत्ता कट, कोण आहेत ते?

Indian Cricket Team :बीसीसीआय निवड समितीने आशिया कप स्पर्धेसाठी 19 ऑगस्टला मुंबईत भारतीय संघाची घोषणा केली. मात्र निवड समितीने 6 खेळाडूंना वगळलं आहे. ते खेळाडू कोण आहेत? जाणून घ्या.

| Updated on: Aug 19, 2025 | 7:12 PM
1 / 7
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात काही बदल  करण्यात आलेत. जसप्रीत बुमराह आणि शुबमन गिल या दोघांचं कमबॅक झालंय. तर यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद सिराज  या स्टार खेळाडूंना संधी मिळालेली नाही. तसेच यासह कोणत्या खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे? हे जाणून घेऊयात. (Photo Credit : PTI)

2 / 7
नितीश कुमार रेड्डी : हार्दिक पंड्या याच्यासह बॉलिंग ऑलराउंडर म्हणून खेळत होता. नितीशने बांगलादेश विरुद्ध टी 20i पदार्पण केलं होतं. मात्र आता नितीशची टी 20i मालिकेसाठी दुखापतीमुळे निवड करण्यात आली नाही. नितीशला इंग्लंड दौऱ्यात दुखापत झाली होती. (Photo Credit : PTI)

3 / 7
रमनदीप सिंह : रमनदीप सिंह याने आयपीएलमध्ये केकेआरसाठी चमकदार कामगिरी केली आणि आपली छाप सोडली. रमनची गेल्या दक्षिण आफ्रिकादौऱ्यासाठी निवड करण्यात आली होती. इंग्लंड विरुद्ध मायदेशात झालेल्या टी 20i मालिकेसाठीही रमनचा समावेश करण्यात आला होता. मात्र आता त्याला संधी मिळाली नाही. (Photo Credit : PTI)

4 / 7
वॉशिंग्टन सुंदर : वॉशिंग्टन सुंदर याने फिरकी बॉलिंगसह बॅटिंगनेही आपली छाप सोडलीय. वॉशी इंग्लंड विरूद्धच्या मालिकेसाठी संघात होता. मात्र आता त्याला संधी दिली नाही. निवड समितीने वॉशीऐवजी अक्षर पटेल याला संधी दिली आहे. तर वॉशीला राखीव म्हणून संधी दिलीय.  (Photo Credit : PTI)

5 / 7
ध्रुव जुरेल : विकेटकीपर बॅट्समॅन ध्रुव जुरेल हा देखील गेल्या अनेक मालिकांमध्ये संघात होता. मात्र आशिया कप स्पर्धेसाठी ध्रुवचा विचार करण्यात आलेला नाही. मात्र ध्रुवला राखीव म्हणून संधी देण्यात आली आहे. (Photo Credit : PTI)

6 / 7
मोहम्मद शमी : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने इंग्लंड विरूद्धच्या टी 20i मालिकेतून कमबॅक केलं होतं. मात्र आता शमीला संधी देण्यात आलेली नाही. शमीचा राखीव म्हणूनही समावेश करण्यात आलेला नाही. (Photo Credit : PTI)

7 / 7
रवी बिश्नोई : लेग स्पिनर रवी बिश्नोई याच्या पदरीही निराशा पडली आहे. रवीलाही आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही. रवी आयसीसी टी 20i बॉलिंग रँकिंगमध्ये सातव्या स्थानी आहे. (Ravi Bishnoi Instagram)