
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांना सलग दुसऱ्या दिवशी शतक पाहायला मिळालंय. श्रीलंकेचा सलामीवीर फलंदाज पाथुम निसांका याने सोमवारी 16 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजयी धावांचा पाठलाग करताना नाबाद शतक झळकावलं. त्यानंतर मंगळवारी 17 फेब्रुवारीला कॅनडाच्या युवराजने शतक झळकावलंय. युवराजने यासह वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. (Photo Credit : PTI)

कॅनडाचा युवा फलंदाज युवराज सामना याने न्यूझीलंड विरुद्ध चाबूक शतक झळकावलं. युवराजने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई करत 65 बॉलमध्ये 110 रन्स केल्या. युवराजने या खेळीत चौकार आणि षटकारांच्या मदतीने 80 धावा केल्या. युवराजने या खेळीत 11 चौकार आणि 6 षटकार लगावले. युवराजने यासह वर्ल्ड कप स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची कामगिरी केली आहे. (Photo Credit : PTI)

युवराज फक्त टी 20I नाही तर आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत शतक करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. युवराजने वयाच्या अवघ्या 19 वर्ष 141 व्या दिवशी न्यूझीलंड सारख्या तगड्या संघाविरुद्ध ही शतकी आणि विक्रमी कामगिरी करुन दाखवली आहे. युवराजने यासह आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंग याचा विक्रम मोडीत काढला. पॉलने 2011 साली वयाच्या 20 वर्ष 196 व्या दिवशी शतक झळकावलं होतं. (Photo Credit : PTI)

युवराजने या शतकासह आणखी काही खास विक्रम केले आहेत. युवराजने टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात शतक करणारा सर्वात युवा फलंदाज हा बहुमान मिळवला आहे. युवराजने यासह पाकिस्तानच्या अहमद शहजाद याला मागे टाकलं. शहजादने 2016 साली झालेल्या टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत 22 वर्ष 127 व्या दिवशी शतक पूर्ण केलं होतं. (Photo Credit : PTI)

तसेच युवराज टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वात मोठी खेळणारा असोसिएट टीमचा पहिला फलंदाज ठरला आहे. तसेच पूर्ण वेळ संघाचा सदस्य म्हणून टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम हा न्यूझीलंडचा माजी फलंदाज ब्रँडन मॅक्युलम याच्या नावावर आहे. मॅक्युलम याने 2012 साली झालेल्या टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत बांग्लादेश विरुद्ध 123 धावांची खेळी केली होती. (Photo Credit : PTI)