
हार्दिक पंड्या आणि ईशान किशन या जोडीने पाकिस्तान विरुद्ध पाचव्या विकेटसाठी 142 बॉलमध्ये 138 रन्सची विक्रमी भागीदारी केली.

हार्दिक आणि ईशान या दोघांनी या भागीदारीसह मोठा विक्रम केला. हार्दिक-ईशान या दोघांनी पाकिस्तान विरुद्ध पाचव्या विकेटसाठी टीम इंडियाकडून विक्रमी भागीदारी केलीय.

हार्दिक-ईशान यांच्याआधी मोहम्मद कैफ आणि राहुल द्रविड यांच्या नावावर पाचव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारीचा रेकॉर्ड होता.

मोहम्मद कैफ आणि राहुल द्रविड या जोडीने पाकिस्तान विरुद्ध 2005 मध्ये 135 रन्सची पार्टनरशीप केली होती. तर पाकिस्तान विरुद्ध याच जोडीने पाचव्या विकेटसाठी 118 धावांची भागीदारी केली होती.

मोहम्मद कैफ आणि राहुल द्रविड या दोघांनी 2004 मध्ये पाकिस्तान विरुद्ध 118 रन्सची पार्टनरशीप केली होती. मात्र आता हा विक्रम हार्दिक-ईशान जोडीच्या नावावर झाला आहे.