
पाकिस्तानचा घातक बॉलर शाहिन अफ्रिदी याने टीम इंडिया विरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड केला. शाहिनने आशिया कपमधील तिसऱ्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध 10 ओव्हरमध्ये 35 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या.

शाहिनने टीम इंडियाच्या 4 प्रमुख फलंदाजांचा काटा काढला. शाहिने कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या आणि रविंद्र जडेजा या चौघांची विकेट घेतली.

शाहिन एकाच वनडे सामन्यात रोहित आणि विराटला क्लिन बोल्ड करणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. शाहिनच्या भेदक माऱ्यासमोर टीम इंडियाचे 4 फलंदाज ढेर झाले.

शाहीनच्या बॉलिंगवर रोहित शर्मा 22 बॉलवर 11 धावा करुन आऊट झाला. तर टीम इंडियाच्या डावातील सातव्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर विराट कोहली क्लिन बोल्ड झाला.

विराटवर दुर्देवी ठरला. विराटच्या बॅटला कट लागून बॉल स्टंपला लागला आणि तो क्लिन बोल्ड झाला. विराटकडून पाकिस्तान विरुद्ध मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र विराटने 7 बॉलमध्ये 4 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.