Babar Azam : बाबरची गाडी घसरली, पाकिस्तानचा फलंदाज सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट

Babar Azam Duck : बाबर आझम पुन्हा एकदा आपल्या आधीच्या भूमिकेत परतला आहे. बाबरने गेल्या काही डावांत चांगली कामागिरी केली होती. मात्र बाबर श्रीलंकेविरुद्ध झिरोवर आऊट झाला. त्यामुळे बाबर पुन्हा आपल्या आधीच्या मार्गावर परतल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात पाहायला मिळत आहे.

Updated on: Nov 28, 2025 | 4:50 PM
1 / 5
पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज बाबर आझम याला गेल्या काही सामन्यांमध्ये सूर गवसला. बाबरने काही सामन्यांत मोठी खेळी केली. मात्र बाबरला हे सातत्य फार वेळ कायम राखता आलेलं नाही. बाबर पुन्हा त्याच ट्रॅकवर परतला आहे. बाबरने पुन्हा एकदा झिरोवर आऊट होण्याची मालिका सुरु केली आहे. (Photo Credit: Getty Images)

2 / 5
बाबर टी 20i ट्राय सीरिजमधील सहाव्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 185 धावांचा पाठलाग करताना अपयशी ठरला. बाबर आला तसाच गेला. बाबरला भोपळाही फोडता आला नाही. श्रीलंकेचा गोलंदाज दुष्मंता चमीरा याने बाबरला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. (Photo Credit: PTI)

3 / 5
बाबर अवघ्या काही दिवसांपूर्वी रोहित शर्मा याला मागे टाकत टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज झाला होता. मात्र बाबर पुन्हा त्याच मार्गावर परतला. बाबरने श्रीलंकेविरुद्ध झिरोवर आऊट होताच नको त्या विक्रमाची बरोबरी केली. उमर गुल आणि सॅम अयुब याच्यानंतर बाबर टी 20i मध्ये दहाव्यांदा झिरोवर आऊट होणारा पाकिस्तानी फलंदाज ठरला.  (Photo Credit: Getty Images)

4 / 5
तसेच बाबरची टी 20i ट्राय सीरिजमधील झिरोवर आऊट होण्याची ही दुसरी वेळ ठरली. बाबर श्रीलंकेआधी झिंबाब्वे विरुद्धही भोपळा फोडण्यात अपयशी ठरला होता.  तसेच बाबर गेल्या 30 दिवसांत तिसऱ्यांदा आणि 10 टी 20i सामन्यांत चौथ्यांदा झिरोवर आऊट झाला आहे.   (Photo Credit: Getty Images)

5 / 5
दरम्यान श्रीलंकेने पाकिस्तानसमोर 185 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र पाकिस्तानला हे आव्हान पूर्ण करता आलं नाही. श्रीलंकेने हा सामना 6 धावांनी जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत पुन्हा एकदा पाकिस्तान-श्रीलंका आमनेसामने असणार आहेत. (Photo Credit: PTI)